गेले काही महिने आपल्या पाठीच्या दुखापतीमुळे संघाबाहेर असलेला अष्टपैलू हार्दिक पांड्या अखेरीस क्रिकेटमध्ये पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे. भारत अ संघाच्या न्यूझीलंड दौऱ्यात पांड्याला संधी देण्यात आलेली आहे. आगामी न्यूझीलंड दौरा आणि टी-२० विश्वचषकाच्या दृष्टीकोनातून पांड्याचं तंदुरुस्त राहणं भारतीय संघासाठी महत्वाचं आहे. महेंद्रसिंह धोनीच्या अनुपस्थितीत हार्दिकने फिनीशरची भूमिका बजावी अशी अपेक्षा होत आहे, मात्र आपण धोनीची जागा कधीच घेऊ शकत नाही असं पांड्याने स्पष्ट केलं आहे.

“मी कधीच धोनीची जागा घेऊ शकत नाही, त्यामुळे मी आता त्याचा विचार करत नाही. मी सध्या न्यूझीलंड दौऱ्यासाठीच्या आव्हानासाठी सज्ज आहे. मी जे काही करेन ते माझ्या संघाच्या भल्यासाठी असेल यात काही शंकाच नाही. एक-एक पाऊल सांभाळत टाकत गेलो, तर ऑस्ट्रेलियात विश्वचषक जिंकण्यापासून आम्हाला कोणीही थांबवू शकणार नाही”, हार्दिक India Today वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.

अवश्य वाचा – विराटचे सूचक संकेत, म्हणाला ‘या’ खेळाडूला मिळू शकतं टी-२० विश्वचषकाचं तिकीट

दरम्यान, वर्षाअखेरीस होणाऱ्या या विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाला सरावासाठी फार कमी सामने मिळतील, त्यामुळे संघाची बांधणी करणं हे विराट आणि रवी शास्त्रींसमोरचं मोठं आव्हान असेल.

अवश्य वाचा – ना धोनी ना शिखर धवन…असा असेल टी-२० विश्वचषकासाठी भारताचा संघ