भारताचा कर्णधार विराट कोहलीने ‘आयसीसी’ कसोटी क्रमवारीच्या फलंदाजांच्या यादीत एक स्थानाने आगेकूच केली असून, तो दुसऱ्या स्थानावर आहे. या यादीत चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे अनुक्रमे सातव्या आणि १०व्या स्थानावर आहेत.

फलंदाजांच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ (९११ गुण) अग्रस्थानावर आहे, तर कोहली दुसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंडचा कर्णधार के न विल्यम्सनची तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा युवा फलंदाज मार्नस लबूशेन, पाकिस्तानचा बाबर आझम आणि दुखापतग्रस्त डेव्हिड वॉर्नर हे अनुक्रमे चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या स्थानावर आहेत.

गोलंदाजांच्या यादीत भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा (७७९ गुण) आणि ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विन (७५६ गुण) अनुक्रमे आठव्या आणि १०व्या स्थानावर आहेत. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स ९०४ गुणांसह अग्रस्थानावर आहे.

अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत रवींद्र जडेजा तिसऱ्या आणि अश्विन सहाव्या स्थानावर आहेत.