वन-डे मालिका गमावल्यानंतर भारतीय फलंदाजांचं ऑस्ट्रेलिया दौऱ्यात निराशाजनक कामगिरीचं सत्र सुरुच राहिलं आहे. पहिल्या टी-२० सामन्यात सलामीवीर लोकेश राहुलच्या अर्धशतकी खेळी आणि रविंद्र जाडेजाच्या फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियाने १६१ धावांपर्यंत मजल मारली आहे. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांवर अंकुश ठेवत त्यांना मोठे फटके खेळण्याची संधीच दिली नाही. परंतू जाडेजाने अखेरच्या षटकांत फटकेबाजी करत टीम इंडियाला आश्वासक धावसंख्येचा टप्पा ओलांडून दिला. महत्वाच्या क्षणी जाडेजाने २३ चेंडूत ५ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ४४ धावा केल्या.

जाडेजाच्या फटकेबाजीने टीम इंडियाचा डाव सावरला असला तरीही संघासमोरच्या अडचणी वाढल्या आहेत. अखेरच्या षटकांत फलंदाजी करत असताना जाडेजाचा मांडीचा स्नायू दुखावला गेला. यानंतर फलंदाजीदरम्यान जाडेजाच्या हेल्मेटवर जोरात बॉल आदळल्यामुळे बीसीसीआयची वैद्यकीय टीम जाडेजाची तपासणी करत आहे. जाडेजाच्या जागेवर चहल बदली खेळाडू म्हणून मैदानावर आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऑस्ट्रेलियाकडून हेन्रिकेजने ३ तर स्वेप्सन-झॅम्पा आणि स्टार्क यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.