अॅडलेडच्या मैदानावर खेळवण्यात येणाऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन माऱ्यासमोर भारताची फलंदाजी कोलमडली. सलामीवीर मुरली विजय, लोकेश राहुल, कर्णधार विराट कोहली, उप-कर्णधार अजिंक्य रहाणे स्वस्तात माघारी परतले. चेतेश्वर पुजाराने एका बाजूने भारताची बाजू लावून धरत संघाला 250 पर्यंतचा टप्पा गाठून दिला.

आजचा सामना भारतीय संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणेसाठी अगदी खास होता. कारण माजी खेळाडू राहुल द्रविडने अजिंक्यच्या बॅटवर आपल्या हाताने संदेश लिहून त्याला आजच्या सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. राहुल द्रविडच्या या खास संदेशाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याआधीही अजिंक्यने बऱ्याच वेळा राहुल द्रविडचं मार्गदर्शन घेतलं आहे.

मात्र, राहुल द्रविडने दिलेल्या या खास संदेशाना अजिंक्य रहाणेवर म्हणावा तसा खास परिणाम झालेला दिसत नाहीये. पहिल्या डावात अजिंक्यने 31 चेंडूंमध्ये 13 धावा केल्या. जोश हेजलवूडच्या गोलंदाजीवर स्लिपमध्ये पिटर हँडस्काँबकडे झेल देत अजिंक्य माघारी परतला. चेतेश्वर पुजाराचा अपवाद वगळता एकही भारतीय फलंदाज ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा सामना करु शकला नाही.