भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा कसोटी सामना पर्थच्या मैदानावर सुरु आहे. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव सर्वबाद ३२६ वर आटोपला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर फिंच, हॅरिस आणि हेड यांनी अर्धशतकी खेळी करत संघाला त्रिशतकी मजल मारून देण्यात मोलाचा वाटा उचलला.

पहिल्या सामन्यात दोनही डावात अपयशी ठरलेला फिंच याने दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या डावात अर्धशतक झळकावले. पण अर्धशतक झाल्यावर लगेचच त्याला बुमराहने बाद केले. पायाजवळ टप्पा टाकत त्याने फिंचला पायचीत केले. दिवसाचा खेळ संपल्यानंतर फिंचने बुमराहच्या गोलंदाजीची स्तुती करत तो जगात भारी गोलंदाज असल्याचे म्हटले.

तो म्हणाला की बुमराह हा जगातील एक उत्तम गोलंदाज आहे. त्याच्या गोलंदाजीवर धावा काढणे खूप कठीण बाब असते. त्याने टाकलेल्या गोलंदाजीत काही चेंडू हे अत्यंत वेगवान आणि न समजणारे होते. त्याला हवे त्याप्रमाणे चेंडू टाकणे ही गोष्ट त्याच्यासाठी फायद्याची आहे. त्याने टाकलेले चेंडू सोडून देणे हा एक चांगला पर्याय असतो, पण त्यामळे तुमहाला धावा जमवण्याचा पर्याय उरत नाही. म्हणून तो जगातील सर्वोत्तम गोलंदाज आहे.

दरम्यान, फिंच अर्धशतक झळकावल्यानंतर लगेचच बाद झाला होता. त्याने १०५ चेंडूत ५० धावा केल्या. त्यात त्याने ६ चौकार लगावले होते.