‘गाबा’च्या मैदानावरील ऑस्ट्रेलियाचा अंजिक्य विजयरथ रोखत भारतानं ऐतिहासिक विजयाची नोंद केली. सलामीवीर फलंदाज शुबमन गिल (९१), अनुभवी चेतेश्वर पुजारा (५६) आणि तुफानी ऋषभ पंत (८५ नाबाद) यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर भारतानं चौथ्या कसोटी सामन्यात तीन गडी राखून विजय मिळवला. या विजयासाह भारतानं बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका २-१ नं जिंकली आहे. या विजयानंतर भारतीय संघावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. सोशल नेटवर्किंगवरही विजय मिळवून देण्याऱ्या ऋषभ पंतपासून ते अगदी भारताचं नेतृत्व करणाऱ्या अजिंक्य रहाणेवरही कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. सोशल नेटवर्किंगवर सर्व टॉप ट्रेण्ड याच विजयासंदर्भातील आहे. असं असतानाच भारतीय क्रिकेट चाहत्यांना तरुण खेळाडूंचे योगदान पाहून राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख पद भूषवणारा राहुल द्रविड सर्वांनाच आठवला. मागील काही तासांमध्ये Rahul Dravid या विषयाबद्दल १० हजारहून अधिक ट्विट करण्यात आले आहेत. स्पोर्ट्स या विषयात द्रविड हा दुसरा टॉप ट्रेण्ड आहे.

भारत अ आणि १९ वर्षाखालील क्रिकेट संघाचे प्रशिक्षक पद भुषवलेल्या द्रविडच्या प्रशिक्षणाखाली तयार झालेल्या तरुण खेळाडूंनी खऱ्या अर्थाने या मालिकेतील विजय भारताच्या बाजूने खेचून आणल्याच्या भावना सोशल नेटवर्किंगवर व्यक्त केल्या जात आहेत. ऋषभ पंत,  पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, मयंक अग्रवाल, शुभमन गील यासारखे या मालिकेमध्ये प्रमुख भूमिका बजावणारे खेळाडू हे द्रविडच्या प्रशिक्षणाखालीच शिकल्याची आठवण आज अनेकांना झालीय. अनेकांनी या मालिकेचा खरा सामनावीर हा द्रवीड असल्याचं म्हटलं आहे. काहींनी द्रवीड भारतीय संघासाठी जे काही करतोय ते कोणीच यापूर्वी केलेलं नाही आणि करणारही नाही असं म्हटलं आहे. द्रविड सध्या सोशल नेटवर्किंगवर टॉप ट्रेण्ड आहेत. नेटकरी त्याच्या बद्दल काय म्हणतायत पाहूयात….

१) इथून सुरु झाली द्रविडच्या नावाची चर्चा

२) सामना पाहताना द्रविड

३) आभार प्रदर्शन

४) मोठा माणूस

५) द्रविडला यांचा अभिमान वाटत असेल

६) त्याला पण धन्यवाद म्हणूयात का?

७) खरा मालिकावीर

८) भारतीय अ संघासाठी त्याने जे काही केलं आहे

९) शिकवण आणि परिणाम

१०) अभिनंदन तुमचंही

पहिल्या कसोटी सामन्यातील दारुण पराभवानंतर भारतीय संघानं फिनिक्स पक्षाप्रमाणे कसोटी मालिकेवर नाव कोरलं आहे. पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतानं ८ गड्यानं विजय मिळवला. तर हनुमा विहारी आणि आर. अश्विन यांनी संयम आणि जिद्दीनं फलंदाजी करत तिसरा कसोटी सामना अनिर्णित राखला. चौथ्या कसोटी सामन्यात सांघिक खेळाच्या बळावर भारतीय संघानं विजय मिळवला.