News Flash

परफेक्ट यॉर्कर! स्टार्कने उडवला शिखर धवनचा त्रिफळा; पाहा व्हिडीओ

ऑस्ट्रेलियाचा भेदक मारा

पहिल्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंचनं नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी आंमत्रित केलं. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत भारताच्या दोन फलंदाजांना स्वस्तात बाद केलं. वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने परफेक्ट यॉर्कर फेकत शिखर धवनचा त्रिफळा उडवला. शिखर धवन अवघी एक धाव काढून बाद झाला.

मोठा फटका मारण्याच्या नादात शिखर धवनने स्टार्कला आपली विकेट बहाल केली. पुढे येऊन खेळण्याच्या प्रयत्नात धवनचा स्टम्प उडाला. पावरप्लेच्या षटकांमध्ये स्टार्कनं भेदक मारा केला. तिसऱ्या षटकांत भारताच्या ११ धावा असताना शिखर बाद झाला.

आणखी वाचा- राहुलची फटकेबाजी, टी-२० क्रिकेटमध्ये विराट-रोहित-धोनीच्या पंगतीत मिळवलं स्थान

दुसऱ्या क्रमांकावर आलेल्या विराट कोहलीलाही आपल्या लौकिकास साजेशी खेळी करण्यात अपयश आलं. विराट कोहली पुन्हा एकदा लेग स्पिनर गोलंदाजानं बाद केलं. विराट कोहलीला फक्त ११ धावा करता आल्या. के. राहुलनं एका बाजून किल्ला लढवत आहे. स्टार्कनं दोन षटकांत ११ धावा देत शिखर धवनची महत्वाची विकेट घेतली. आयपीएलमध्ये शिखर धवनने लागोपाठ दोन शतकं झळकावली होती.

भारतीय संघाने पहिल्या टी-२० सामन्यासाठी संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर या आयपीएल गाजवणाऱ्या खेळाडूंना स्थान दिलं आहे. याचसोबत अखेरची वन-डे गाजवणारा टी. नटराजनही आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण करतो आहे. त्यामुळे पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय संघाची कामगिरी कशी होतेय याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 4, 2020 2:27 pm

Web Title: ind vs aus starc dhavan virat video nck 90
Next Stories
1 सामना जिंकवून देणं हे माझं काम, संधी का मिळत नाही याचा फारसा विचार करत नाही !
2 Ind vs Aus : अभ्यास केला जाडेजाचा, प्रश्न आला चहलचा; पहिल्या टी-२० त भारताचा धडाकेबाज विजय
3 सचिनपासून विराटपर्यंत कोणालाही मोडता आला नाही आगकरचा ‘हा’ विक्रम
Just Now!
X