ऑस्ट्रेलियाविरुद्धचा चौथा कसोटी सामना पावसाच्या सततच्या व्यत्ययामुळे अनिर्णित राहिला. पण भारताने कसोटी मालिका मात्र २-१ने जिंकली. भारताला स्वातंत्र्य मिलाळाल्यापासून प्रथमच टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाच्या भूमीत कसोटी मालिका जिंकण्याचा भीमपराक्रम केला. ही कसोटी मालिका भारतीय संघाचा यष्टीरक्षक ऋषभ पंतला चांगलीच फलदायी ठरली. ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत ऋषभ पंतने सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसरे स्थान पटकावले. भारताचा रनमशीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विराट कोहलीलादेखील त्याने मागे टाकले. तो त्याचा खेळामुळे आणि स्लेजिंगमध्ये चर्चेत आलाच. पण त्यासह तो त्याच्या ‘कुल’ अंदाजांमुळेही लोकप्रिय ठरला.

चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी हनुमा विहारी बाद झाल्यानंतर पंत सातव्या क्रमांकावर मैदानामध्ये उतरला. आक्रामक खेळी करत पंतने अवघ्या १८९ चेंडूमध्ये १५९ धावांची नाबाद खेळी केली. या खेळीमध्ये त्याने चौकार आणि षटकारांचा रतीबच लावला होता. पंतची ही खेळी पाहून मैदानामधील ‘भारत आर्मी’ने त्याच्यावर एक गाणं तयार केलं. मालिका संपल्यानंतर तो मैदानावर त्याच गाण्यावर नाचताना दिसला.

त्याचा हा व्हिडीओ भारत आर्मीने ट्विट केला आहे.