India tour of australia 2020 : शुक्रवार, २७ नोव्हेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये तीन सामन्याच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात होत आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीमुळे शिखर धवनसोबत सलामीला कोण येणार? हा प्रश्न संघ व्यवस्थापना बरोबरच क्रीडा प्रेमींनाही पडला आहे. या जागेसाठी तीन नावांची सध्या संघ व्यवस्थापनामध्ये चर्चा सुरु आहे. यामध्ये मयंक अग्रवाल, शुभमन गिल आणि के. एल राहुल यांचा समावेश आहे. राहुल पाचव्या क्रमांकावरही फलंदाजी करु शकतो. मात्र संघ व्यवस्थापन काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

भारतीय संघाचं मुख्य उद्देय बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका जिंकणं हा आहे. पण मर्यादित षटकांच्या सामन्यामुळे येथील वातावरणाशी खेळाडूंना जुळवून घेता येईल तसेच संघाचं मनोबलही वाढेल. कर्णधार विराट कोहलीला एकदिवसीय सामन्यासाठी संघाची बांधणी व्यवस्थित करवी लागणार आहे. पुढील वर्षी होणाऱ्या टेस्ट चॅम्पियनशिप आणि टी-२० विश्वचषक होणार असल्यामुळे एकदिवसीय मालिकेला फारसं महत्व नसणार आहे.

(आणखी वाचा : पृथ्वी शॉ च्या ‘लैला’ डान्सवर धवन फिदा, पाहा व्हिडीओ )

याआधी झालेल्या न्यूझीलंड दौऱ्यात भारताचा ०-३ नं पराभव झाला होता. या दौऱ्यात मयंक अग्रवालला तिन्ही सामन्यात सलामीला संधी देण्यात आली होती. मात्र, मयंकला सातत्यापूर्ण कामगिरी करता आली नव्हती. भारतीय संघाकडे यावेळी शुभमन गिल, राहुल यासारखे अन्य पर्यायही उपलबद्ध आहेत. अशा परिस्थितीत कोहली आणि रवी शास्त्री एससीजीचं (सिडनी क्रिकेट मैदान) पिच आणि ऑस्ट्रेलियाचा वेगवान माऱ्याला पाहून काय निर्णय घेतील ? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

(आणखी वाचा : रोहित शर्माच्या अनुपस्थितीचा भारताला फटका बसेल का? )

रवी शास्त्री यांनी रविवारी शुभमन गिलसोबत चर्चा केली आहे. गिलसोबत शास्त्री यांनी ट्विटरवर फोटो पोस्ट करत त्याचं कौतुक केलं आहे. शुभमन आणि मयंक यांचा फॉर्म सध्या सारखाच आहे. आयपीएलमध्ये केकेआरकडून खेळताना गिलनं ४४० धावा केल्या आहेत. तर मयांकनं पंजाबकडून खेळताना ४२४ धावा केल्या आहेत. भारतीय संघात ८ खेळाडूंची जागा जवळपास पक्की आहे. यामध्ये धवन, कोहली, अय्यर, राहुल (सलामीसाठी आणखी एक पर्याय), हार्दिक पांड्या, जाडेजा, चहल आणि बुमराह यांच्या नावाचा समावेश आहे. वेगवान गोलंजीमध्ये शामी आणि सैनी यांचाही समावेश होऊ शकतो. संघ व्यवस्थापनानं शार्दुल ठाकूरला संधी दिल्यास बुमराह आणि शामी यांच्यापैकी एकाला आराम देण्यात येऊ शकतो.