फलंदाजीत अपयशी ठरलेल्या ऑस्ट्रेलिया संघाने क्षेत्ररक्षणही गचाळ केलं. एकवेळ क्षेत्ररक्षणासाठी जागतिक क्रिकेटमध्ये आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या कांगारूंनी निर्णायक सामन्यात विराट कोहली आणि धोनीला जिवदान दिले. विराट कोहलीने मिळालेल्या जिवदानाचा फायदा घेत ४६ धावांची खेळी केली. २३ धावांवर विराटचा सोपा झेल मॅक्सवेलने सोडला होता. धोनीला कांगारूंनी दोन वेळा जिवदान दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी धोनीला धावबाद करण्याची संधी दोन वेळा सोडली. याचा फायदा घेत धोनीने अर्धशतकी खेळी केली. धोनीने नाबाद ८७ धावांची खेळी केली.  विराट कोहली बाद झाल्यानंतर धोनीने केदार जाधवच्या साथीने भारताला विजय मिळवून दिला. धोनी पाचवेळा तीन धावा धावून काढल्या. एकेरी आणि दुहेरी धावा घेत धोनी एकाबाजूने खंबीरपणे उभा राहिला. गचाळ क्षेत्ररक्षण कांगारूंना चांगलेच महागात पडले.

(आणखी वाचा  : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा सुफळ संपूर्ण; वन-डे मालिकेतही भारताचा ऐतिहासिक विजय)

तिसऱ्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा सात विकटने पराभव करत ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय मिळवला. टी-२० सामन्याची मालिका भारताने १-१ अशी बरोबरीत सोडली. त्यानंतर कसोटी आणि एकदिवसीय सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा दारूण पराभव केला.

धोनीने तीन एकदिवसीय सामन्यात तीन अर्धशतके झळकावतं दमदार फलंदाजी केली. पहिल्या एकदविसीय सामन्यात संथ फलंदाजीमुळे धोनीवर टीका झाली होती. मात्र, दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात धोनीने संयमी आणि निर्णायक फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus virat kohli ms dhoni australia india team india win
First published on: 18-01-2019 at 16:40 IST