News Flash

IND vs BAN : विराट-रोहितच्या शर्यतीत पुन्हा विराटचीच बाजी !

पुजारासोबत विराटची महत्वपूर्ण भागीदारी

कोलकाता कसोटीत बांगलादेशला पहिल्या डावात १०६ धावांवर गारद केल्यानंतर भारतीय फलंदाजांनी धडाकेबाज सुरुवात केली आहे. पहिल्या दिवशी अखेरच्या सत्रात भारताने आपले ३ फलंदाज गमावले, मात्र पुजारा आणि कोहलीच्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर भारताने सामन्यात आघाडी घेतली. सलामीवीर मयांक अग्रवाल आणि रोहित शर्मा माघारी परतल्यानंतर पुजारा आणि कोहली यांनी महत्वपूर्ण भागीदारी करत भारताचा डाव सावरला.

चेतेश्वर पुजारा ५५ धावांची खेळी करुन माघारी परतला. यानंतर कर्णधार विराटनेही आपलं अर्धशतक झळकावलं. या खेळीदरम्यान विराटने रोहित शर्माला माघारी टाकलं आहे. २०१९ वर्षात सर्वाधीक वेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट आता पहिल्या स्थानावर आला आहे.

याचसोबत, कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार या नात्याने ५ हजार धावा काढणारा विराट पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे. त्याने ८६ डावांमध्ये ही कामगिरी करत माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पाँटींगचा विक्रम मोडला आहे. रिकी पाँटींगने ९७ डावांमध्ये याआधी अशी कामगिरी करुन दाखवली होती.

अवश्य वाचा – IND vs BAN : विराटचा विक्रम, अनोखी कामगिरी करणारा पहिला भारतीय कर्णधार

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2019 8:21 pm

Web Title: ind vs ban 2nd test kolkata indian skipper virat kolhi gets pass rohit sharma to create unique record psd 91
टॅग : Ind Vs Ban,Virat Kohli
Next Stories
1 IND vs BAN : विराटचा विक्रम, अनोखी कामगिरी करणारा पहिला भारतीय कर्णधार
2 Video : रोहितने गमावलं, पुजाराने कमावलं ! हा भन्नाट झेल एकदा पाहाच…
3 IND vs BAN : सबकुछ इशांत शर्मा ! ऐतिहासिक दिवस-रात्र कसोटीत सर्वोत्तम कामगिरीची नोंद
Just Now!
X