भारत आणि बांगलादेश यांच्यात रविवारी होत असलेल्या आशिया चषक स्पर्धेतील अंतिम सामन्यापूर्वीच दोन्ही देशांच्या चाहत्यांमध्ये द्वंद्व रंगण्याची शक्यता आहे. बांगलादेशच्या चाहत्यांकडून तयार करण्यात आलेले वादग्रस्त पोस्टर या वादाचे कारण ठरण्याची शक्यता आहे. बांगलादेशचा अष्टपैलू क्रिकेटपटू तस्कीन अहमद भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे कापलेले शिर हातात धरून गर्जना करत असल्याचे हे पोस्टर सध्या सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाले आहे. त्यामुळे उद्याच्या सामन्यात दोन्ही देशांच्या चाहत्यांमध्ये वेगळीच ‘टशन’ अनुभवायला मिळू शकते. यापूर्वीही बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारताचा पराभव झाल्यानंतर एका बांगलादेशी वृत्तपत्राने धोनी आणि शिलेदारांची अर्ध-मुंडन केलेली छायाचित्रे छापली होती. याशिवाय, त्याच मालिकेतील पहिल्या सामन्यातील विजयानंतर काही उन्मादी क्रिकेटप्रेमींनी भारतीय चाहत्यावर हल्ला चढवला होता. या घृणास्पद प्रकाराबाबत क्रिकेट चाहत्यांमधून संताप व्यक्त करण्यात आला होता.
थरारक विजयासह बांगलादेश अंतिम फेरीत