England tour of india 2021 : भारतीय संघाची ५ फेब्रुवारीपासून इंग्लंडविरूद्ध कसोटी मालिका सुरू होणार आहे. या मालिकेत सहभागी होण्यासाठी बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर भारतात दाखल झाले आहेत. बेन स्टोक्सनं विमानातील एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे. या फोटोवर त्यानं ‘भारतीयांनो, लवकरच भेटूयात’ असं कॅप्शनही दिलं आहे.

भारताविरोधातील मालिकेआधी सध्या इंग्लंडचा संघ श्रीलंकेत कसोटी मालिका खेळत आहे. पहिला सामना इंग्लंडने जिंकला असून दुसरा सामना गॉलच्या मैदानावर सुरू आहे. या मालिकेनंतर इंग्लंडचा संघ भारतात येणार आहे. श्रीलंका दौऱ्यात आराम देण्यात आलेल्या खेळाडूचं भारतामध्ये आगमन झालं आहे. यामध्ये बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर आणि रोरी बर्न्‍स यांचा समावेश आहे. बेन स्टोक्स यांनं भारता येण्यासाठी रवाना झाल्याचं सोशल मीडियावरुन आपल्या चाहत्यांना सांगितलं. मात्र, काही नेटकऱ्यांनी बेन स्टोक्सला ट्रोल केलं आहे. त्याच्यावर अनेक मजेदार मिम्सही पोस्ट करण्यात आले आहेत.

 

भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान होणाऱ्या कसोटी मालिकेतील पहिले दोन सामने चेन्नईमध्ये होणार आहेत. तर अखेरचे दोन सामने अहमदाबादमधील मोटेरा स्टेडिअममध्ये होणार आहेत. पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यासाठी भारत आणि इंग्लंड संघाची घोषणा झाली आहे. पाहूयात दोन्ही संघात कोणाला संधी देण्यात आली आहे.

भारतीय संघ : रोहित शर्मा, शुबमन गिल, मयांक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे(उपकर्णधार), ऋषभ पंत, वृद्धीमान साहा, हार्दिक पंड्या, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, वॉशिंगटन सुंदर आणि अक्षर पटेल.

इंग्लंडचा संघ: जो रूट (कर्णधार), जोफ्रा आर्चर, मोइन अली, जेम्स अँडरसन, डॉम बेस, स्टुअर्ट ब्रॉड, रोरी बर्न्स, जोस बटलर, जॅक क्राउली, बेन फोक्स, डॅन लॉरेन्स, जॅक लीच, डॉम सिबली, बेन स्टोक्स, ओली स्टोन आणि ख्रिस वोक्स.