मुंबईकर श्रेयस अय्यरने गेल्या काही सामन्यात केलेल्या धडाकेबाज कामगिरीच्या जोरावर भारतीय संघात चौथ्या क्रमांकाच्या जागेवर आपली दावेदारी बळकट केली आहे. न्यूझीलंडविरुद्धची वन-डे मालिका गमावल्यानंतर, अखेरच्या वन-डे सामन्यातही भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर मयांक अग्रवाल आणि कर्णधार विराट कोहली झटपट माघारी परतल्यामुळे भारतीय संघ अडचणीत सापडला होता.

मात्र श्रेयस अय्यरने सर्वात आधी आपला मुंबईकर साथीदारी पृथ्वी शॉ आणि त्यानंतर लोकेश राहुलसोबत महत्वपूर्ण भागीदारी रचत संघाचा डाव सावरला. यादरम्यान श्रेयसने आपलं अर्धशतकही साजरं केलं. यासह श्रेयसने न्यूझीलंडमध्ये वन-डे सामन्यात सलग ३ सामन्यांत अर्धशतकी खेळी करण्याच्या धोनीच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

श्रेयस अय्यरने न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा समर्थपणे सामना करत, ६३ चेंडूत ६२ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत ९ चौकारांचा समावेश होता. श्रेयस मोठी खेळी उभी करणार असं वाटत असतानाच जिमी निशमच्या गोलंदाजीवर झेलबाद होऊन माघारी परतला.

अवश्य वाचा – Ind vs NZ : सलग तिसऱ्या सामन्यात विराट अपयशी