बीसीसीआयकडून बंदीची शिक्षा उठवल्यानंतर हार्दिक पांड्याने पुनरागमनाच्या पहिल्याच सामन्यात आपली उपयुक्तता सिद्ध केली. अखरेच्या वन-डे सामन्यातही फलंदाजीदरम्यान हार्दिक पांड्याने शेवटच्या षटकांमध्ये तुफान फटकेबाजी करत न्यूझीलंडच्या गोलंदाजांच्या नाकीनऊ आणले. हार्दिक पांड्याने 22 चेंडूत 45 धावा ठोकल्या, या खेळीत 2 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता. या कामगिरीसह हार्दिकने न्यूझीलंडविरुद्ध एका वन-डे सामन्यात सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरशी बरोबरी केली आहे.

अवश्य वाचा – ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्यातील वेळापत्रकात बदल

माजी अष्टपैलू युसूफ पठाण या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. 2010 साली न्यूझीलंडच्या भारत दौऱ्यावेळी युसूफने 7 षटकार ठोकले होते. हार्दिक पांड्याने आजच्या सामन्यात 5 षटकार ठोकत सचिनच्या कामगिरीशी बरोबरी केली.

न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात सर्वाधिक षटकार ठोकणारे खेळाडू –

युसूफ पठाण – 7 षटकार – (वर्ष 2010)

युवराज सिंह – 6 षटकार – (वर्ष 2009)

विरेंद्र सेहवाग – 6 षटकार – (वर्ष 2009)

हार्दिक पांड्या – 5 षटकार – (वर्ष 2019)

सचिन तेंडुलकर – 5 षटकार – (वर्ष 2009)

सुरेश रैना – 5 षटकार – (वर्ष 2009)

अवश्य वाचा – IND vs NZ : पुनरागमन केलेल्या धोनीची बोल्टच्या गोलंदाजीवर दांडी गुल