पहिल्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजने भारताला ८ गडी राखून धूळ चारली. शिमरॉन हेटमायर (१३९) आणि शे होप (१०२) यांनी ठोकलेल्या शतकांच्या जोरावर वेस्ट इंडिजने मालिकेत विजयी सलामी दिली. हेटमायर आणि होप यांच्या फटकेबाजीवर अंकुश लावणं कोणत्याही भारतीय गोलंदाजाला जमलं नाही. या दोघांनी द्विशतकी भागीदारी केली. त्यामुळे वेस्ट इंडिजने ४८ व्या षटकातच विजयावर शिक्कामोर्तब केले.

डॅनियलने घेतली चहलची फिरकी, म्हणाली…

या सामन्यात ऋषभ पंतला सूर गवसला. त्याने ७१ धावांची दमदार खेळी केली आणि भारताला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. त्याच्या या खेळीची खूप प्रशंसा करण्यात आली. भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याने पंतला मोलाचा सल्ला दिला. “ऋषभ पंतने खेळात सातत्य राखायला हवे. तो तिन्ही फॉरमॅटने खेळतो. सध्या जरी तो कसोटी क्रिकेटमध्ये खेळत नसला, तरी त्याचा भारतीय चमूमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे त्याच्यावर संघ व्यवस्थापनाचा विश्वास आहे, हे दिसून येते. पण तरीदेखील पंतने मैदानावर खेळताना कामगिरीत सातत्य राखायला हवे. ६०-७० धावांची खेळी शतकात परावर्तित करणे आता पंतला जमायला हवे. महेंद्रसिंग धोनी अशी कामगिरी सातत्याने करायच, तसं पंतला जमले पाहिजे”, असं गंभीर म्हणाला.

मराठमोळ्या स्मृतीला ICC कडून मिळाला बहुमान

वेस्ट इंडीजची विजयी सलामी

भारताने प्रथम फलंदाजी करत २८७ धावांपर्यंत मजल मारली. भारतीय संघाची सुरुवात अडखळती झाली. राहुल, रोहित, विराट झटपट बाद झाले. त्यानंतर ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर या दोघांनी भारताचा डाव सावरला. पंतने ७१ तर अय्यरने ७० धावांची खेळी केली. हे दोघे माघारी परतल्यानंतर केदार जाधव आणि रविंद्र जाडेजा यांनी सहाव्या विकेटसाठी ५९ धावांची भागीदारी करत भारताला २८७ धावांचा टप्पा गाठून दिला. कॉट्रेल, पॉल आणि जोसेफ यांनी २-२ तर पोलार्डने १ बळी टिपला.

टीम इंडिया विरूद्धच्या ODI मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर

भारताप्रमाणे विंडीजच्या डावाची सुरुवातही खराब झाली होती. मात्र यानंतर हेटमायर आणि होप जोडीने नेटाने भारतीय गोलंदाजीचा सामना करत मैदानावर आपला जम बसवला. दुसऱ्या विकेटसाठी द्विशतकी भागीदारी रचत त्यांनी अक्षरश: भारताकडून विजय हिसकावून घेतला. दीपक चहर आणि मोहम्मद शमीने भारताकडून १-१ बळी घेतला.