दोहात सुरु असलेल्या Asian Team Snooker Championship स्पर्धेत भारतीय संघाला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं आहे. पाकिस्तानी संघाने अंतिम फेरीत भारतावर ३-२ ने मात करुन सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं.

पाकिस्तानच्या बाबर मैशने भारताचा अनुभवी खेळाडू पंकज अडवाणीला पराभवाचा धक्का देऊन पाकिस्तानला आघाडी दिली. यानंतर झालेल्या सामन्यात मलकित सिंहने मोहम्मद असिफचा पराभव करुन सामन्यात १-१ अशी बरोबरी केली. मात्र दुहेरीच्या सामन्यात मोक्याच्या क्षणी मलकित सिंहला आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. अखेर पाकिस्तानी जोडीने भारताला बॅकफूटवर ढकलत सामन्यात बाजी मारली.