News Flash

IND vs SL 1st ODI : कुठे आणि कधी पाहता येणार सामना?

शिखर धवन करणार भारतीय संघाचे नेतृत्व

भारत-श्रीलंका मालिका

भारत आणि श्रीलंका दरम्यान पहिला एकदिवसीय सामना रविवारी १८ जुलै रोजी होणार आहे. शिखर धवन भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. या दौर्‍यावर धवन नवीन इतिहास घडवण्यासाठी सज्ज झाला आहे. तो प्रथमच टीम इंडियाचा कर्णधार होणार आहे. एकदिवसीय सामन्यात आतापर्यंत २४ खेळाडूंनी भारतासाठी कर्णधारपद भूषवले आहे. धवन भारतीय संघाचे नेतृत्व करणारा २५वा खेळाडू ठरेल. पृथ्वी शॉ श्रीलंका दौर्‍यावर शिखर धवनबरोबर सलामी देऊ शकतो. या वर्षाच्या सुरुवातीस शॉला कसोटी संघातून वगळण्यात आले.

या दरम्यान, मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याने शानदार फलंदाजी केली. श्रीलंका दौर्‍यावर मध्यम फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव याच्याकडेही सर्वांच्याच नजरा असतील. घरगुती क्रिकेट आणि आयपीएलमधील सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्याला यावर्षी मार्चमध्ये इंग्लंडविरुद्ध टी-२० मध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. यजुर्वेंद्र चहलसाठीही श्रीलंका दौरा खूप महत्वाचा आहे. निवड समितीची नजरही त्याच्यावर आहे.

सामना कधी सुरू होणार?

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना १८ जुलै रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता सुरू होईल.

सामना कुठे होणार?

हा सामना कोलंबोच्या आर. प्रेमादासा स्‍टेडियमवर खेळला जाईल.

सामना कुठे पाहता येईल?

हा सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर प्रसारित केला जाईल.

सामन्याचे लाइव्ह स्ट्रिमिंग कुठे पाहता येणार?

सामन्याचे लाइव्ह स्ट्रिमिंग सोनी लिव्हवर पाहायला मिळेल.

हेही वाचा – शेवटच्या षटकात होती ३५ धावांची गरज, फलंदाजानं ठोकले ६ षटकार!

श्रीलंकेचा संघ

दासुन शनाका (कर्णधार), धनंजया डी सिल्वा (उप-कर्णधार), अविष्का फर्नांडो, भानुका राजपक्षे, पथुम निसांका, चरित असालान्का, वानेंदू हसरंगा, एशेल बंडारा, मिनोद भानुका, लाहिरू उदारा, रमेश मेंडिस, चमिका करुणरत्ने, बिनुरा फर्नांडो (एकदिवसीय मालिकेतून बाहेर), दुश्मंता चमीरा, लक्ष्मण संदाकन, अकिला धनंजय, शिरण फर्नांडो, धनंजय लक्ष्मण, ईशान जयरात्ने, प्रवीम जयविक्रमा, कसुन रजीता, लाहिरू कुमारा आणि इसरू उदाना.

भारतीय संघ

शिखर धवन (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड़, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नितीश राणा, इशान किशन, संजू सॅमसन, यजुर्वेंद्र चहल, राहुल चहर, कृष्णप्पा गौतम, क्रुणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, दीपक चहर, नवदीप सैनी आणि चेतन साकारिया.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2021 3:37 pm

Web Title: india sri lanka first odi live streaming when and where to watch adn 96
Next Stories
1 शेवटच्या षटकात होती ३५ धावांची गरज, फलंदाजानं ठोकले ६ षटकार!
2 टोकियो ऑलिम्पिक : १०० पेक्षा जास्त भारतीय खेळाडू होणार सहभागी, वाचा खेळाडूंची नावं
3 “इशान किशनसमोर विराटची बॅटिंग थंड”, भारताच्या स्टार समालोचकानं दिलं मत
Just Now!
X