मधल्या फळीतल्या फलंदाजांनी केलेल्या निराशेमुळे भारताला पाचव्या वन-डे सामन्यात मोठी धावसंख्या गाठता आली नाहीये. एका क्षणाला भारत ३०० ची धावसंख्या गाठेल असं वाटत असताना आफ्रिकेच्या गोलंदाजांनी भारतीय संघाला २७४ धावांवर रोखलं. सलामीवीर रोहित शर्माला आजच्या सामन्यात सूर सापडला, आफ्रिकेच्या माऱ्याला तोंड देत रोहितने आजच्या सामन्यात शतकी खेळी केली. कर्णधार विराट कोहलीसोबत दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारीही केली. मात्र रोहितसोबत चोरटी धाव घेण्याच्या नादात अजिंक्य आणि कर्णधार विराट कोहली धावबाद होऊन माघारी परतले. यानंतर रोहितने श्रेयस अय्यरसोबत भागीदारी करुन भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र रोहित माघारी परतल्यानंतर भारताच्या मधल्या फळीतल्या फलंदाजांनी पुन्हा एकदा निराशा केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एन्गिडीने ४ बळी घेत भारताची मधली फळी कापून काढली. कगिसो रबाडाला सामन्यात १ बळी मिळाला. चौथा सामना जिंकून आफ्रिकेने मालिकेत आपलं आव्हान अद्यापही कायम ठेवलं आहे. त्यातचं पाचव्या सामन्यात भारताला पुन्हा एकदा मोठी धावसंख्या उभारण्यात आफ्रिकेला यश आलं.

सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज भारताने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग सहज करतील असं वाटलं होतं. मात्र हाशिम आमलाचा अपवाद वगळता एकही फलंदाज खेळपट्टीवर जास्त काळ टिकू शकला नाही. आमला आणि मार्क्रम या जोडीने आफ्रिकेच्या डावाची चांगली सुरुवात केली. मात्र मार्क्रम माघारी परतल्यानंतर आफ्रिकेच्या संघाची घसरगुंडी उडाली. मधल्या फळीत डेव्हिड मिलर आणि यष्टीरक्षक क्लासेन यांनी आमलाची साथ देण्याचा प्रयत्न केला. मात्र या तीनही फलंदाजांना माघारी धाडण्यात भारताला यश आलं. यानंतर उरलेल्या फलंदाजांना भारतीय गोलंदाजांनी झटपट गुंडाळून सामन्यात ७३ धावांनी बाजी मारली. या विजयासह भारताने ६ सामन्यांच्या मालिकेत ४-१ अशी विजयी आघाडी घेतलेली आहे.

  • पाचव्या वन-डे सामन्यात भारत ७३ धावांनी विजयी, मालिकाही ४-१ च्या फरकाने खिशात
  • चहलच्या गोलंदाजीवर मॉर्ने मॉर्कल माघारी, आफ्रिकेचा डाव २०१ धावांवर आटोपला
  • तबरेझ शम्सीही कुलदीपच्या षटकात झेलबाद, आफ्रिकेला नववा धक्का
  • क्लासेनही कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर माघारी, आफ्रिकेचा आठवा गडी माघारी
  • कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर रबाडा माघारी, आफ्रिकेला सातवा धक्का
  • क्लासेन – रबाडा जोडीकडून छोटी भागीदारी
  • कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर फेलुक्वायो त्रिफळाचीत, आफ्रिकेचा सहावा गडी बाद
  • मात्र हार्दिक पांड्याच्या थेट फेकीवर हाशिम आमला धावबाद, आफ्रिकेचा पाचवा गडी माघारी
  • आमला – क्लासेन जोडीकडून आफ्रिकेचा डाव सावरण्याचा प्रयत्न
  • सलामीवीर हाशिम आमलाचं अर्धशतक
  • चहलच्या गोलंदाजीवर मिलर त्रिफळाचीत, आफ्रिकेचा चौथा गडी माघारी
  • दोघांमध्येही चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी, आफ्रिकेने ओलांडला शंभर धावसंख्येचा टप्पा
  • हाशिम आमला – डेव्हिड मिलर जोडीने आफ्रिकेचा डाव सावरला
  • हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर एबी डिव्हीलियर्स माघारी, आफ्रिकेचे ३ गडी माघारी
  • पाठोपाठ जे. पी. ड्युमिनी अवघी एक धाव काढून माघारी, आफ्रिकेचे २ गडी तंबूत परतले
  • कर्णधार एडन मार्क्रम माघारी, जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर कोहलीने घेतला मार्क्रमचा झेल
  • सलामीवीर हाशिम आमला आणि एडन मार्क्रमकडून फटकेबाजी, दोघांमध्ये अर्धशतकी भागीदारी
  • दक्षिण आफ्रिकेच्या सलामीवीरांकडून डावाची सावध सुरुवात
  • भारतीय फलंदाजांची पुन्हा हाराकिरी, आफ्रिकेला विजयासाठी २७५ धावांचं आव्हान
  • लुंगी एन्गिडीचे सामन्यात ४ बळी
  • एन्गिडीच्या गोलंदाजीवर धोनी फटकेबाजी करण्याच्या नादात माघारी, भारताला सातवा धक्का
  • धोनी – भुवनेश्वरकडून शेवटच्या षटकांत फटकेबाजीचा प्रयत्न
  • ठराविक अंतराने श्रेयस अय्यरही माघारी परतला, मधल्या फळीतल्या फलंदाजांकडून पुन्हा निराशा
  • पाठोपाठ हार्दिक पांड्या भोपळाही न फोडता माघारी, निम्मा संघ तंबूत परतला
  • अखेर रोहित शर्माला माघारी धाडण्यात आफ्रिकेला यश, भारताला चौथा धक्का
  • दोघांमध्ये चौथ्या विकेटसाठी ६० धावांची भागीदारी
  • रोहित शर्मा – श्रेयस अय्यर जोडीकडून भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न
  • अखेर रोहित शर्माने झळकावलं शतक, भारताची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल
  • भारताने ओलांडला २०० धावांचा टप्पा
  • रोहित शर्माला ९६ धावांवर जीवदान, तबरेझ शम्सीने सोडला रोहितचा सोपा झेल
  • अजिंक्य रहाणे माघारी, भारताला तिसरा धक्का
  • भारतीय फलंदाजांची पुन्हा हाराकिरी, चोरटी धाव घेण्याच्या नादात आणखी एक फलंदाज धावबाद
  • भारताला दुसरा धक्का, कर्णधार विराट कोहली माघारी
  • रोहित – विराटची भागीदारी मोडली, चोरटी धाव घेताना विराट कोहली धावबाद
  • रोहित शर्मा – विराट कोहलीमध्ये शतकी भागीदारी
  • रोहित शर्माला सूर गवसला, पाचव्या वन-डे सामन्यात झळकावलं अर्धशतक
  •  रोहित – विराटमध्ये दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी
  • भारताचा डाव सावरला, रोहित शर्मा – विराट कोहलीच्या भागीदारीने ओलांडला १०० धावसंख्येचा टप्पा
  • भारताने ओलांडला ५० धावांचा टप्पा
  • सुरुवातीच्या षटकांमध्ये चाचपडणाऱ्या रोहित शर्मालाही सूर गवसला
  • मात्र फटकेबाजी करताना रबाडाच्या गोलंदाजीवर शिखर धवन बाद, भारताला पहिला धक्का
  • शिखर धवनकडून भारतीय डावाची आक्रमक सुरुवात
  • पाचव्या सामन्यासाठी भारतीय संघात कोणताही बदल नाही
  • दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India tour of south africa 2018 ind vs sa 5th odi live updates
First published on: 13-02-2018 at 16:07 IST