ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि विद्यमान समालोचक रिकी पाँटिंगला भरातीय चाहत्यांच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे. अनेक नेटकऱ्यांनी पाँटिंगच्या वक्तव्यानंतर त्याला ट्रोल करत टीकास्त्र सोडलं आहे. यामध्ये भारताचे माजी खेळाडू विरेंद्र सेहवाग आणि वासिम जाफर यांचाही समावेश आहे. चौथ्या डावात भारतीय फलंदाज २०० धावाही करु शकणार नाही, असं वक्तव्य केलं होतं. यामुळेच पाँटिंगला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

सिडनी कसोटी सामन्यात ४०७ धावांचा पाठलाग करताना चौथ्या दिवसाअखेर भारतीय संघानं दोन गड्यांच्या मोबदतल्यात ८० धावा केल्या होत्या. चौथ्या दिवसाच्या खेळानंतर #AskRicky अंतर्गत एका युजर्सनं भारतीय संघ पाचव्या दिवशी किती धावसंख्यापर्यंत पोहचेल असा प्रश्न रिकी पाँटिंगला विचारला होता. त्यावर बोलताना पाँटिंग म्हणला की, पाचव्या दिवशी भारतीय संघाला २०० धावाही करता येणार नाहीत.

आणखी वाचा- चेतेश्वर पुजारा ‘सहा हजारी’ मनसबदार; या खेळाडूंनीही केलाय हा कारनामा

प्रत्येक्षात मात्र पाचव्या दिवशी ऋषभ पंत आणि चेतेश्वर पुजाराच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर भारतीय संघानं सामन्यात रोमांच आणला आहे. पुजारानं ७४ तर पंतनं ९७ धावांची निर्णायक खेळी केली आहे. भारतीय संघानं २७५ धावांचा टप्पाही ओलांडाला आहे. भारतीय संघानं २०० धावांचा टप्पा ओलांडल्यानंतर नेटकऱ्यांनी पाँटिगला ट्रोल केलं आहे. भारताचा माजी विस्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवागनेही एक फोटो पोस्ट करत रिकी पाँटिगला ट्रोल केलं आहे. म्हणतात ना एक फोटो परिस्थिती बोलून दाखवतो.. तशीच अवस्था या फोटमधून पाँटिंगची दिसून येत आहे. सेगवागनं पंतसोबतचा पाँटिंगचा एक फोटो पोस्ट केला आहे. आयपीएलदरम्यानचा हा फोटो आहे. रिकी पाँटिंग दिल्लीच्या संघाचा कोच आहे.

आणखी वाचा- गरज पडल्यास इंजेक्शन घेऊन जाडेजा उतरणार मैदानात

सेहगावशिवाय माजी क्रिकेटपटू वासिम जाफरनेही आपल्या खास शैलीत पाँटिंगला ट्रोल केलं आहे. ट्विट डिलीट करण्याची हीच योग्य वेळ असल्याचं जाफरनं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पाँटींग सध्या चॅनल 7 वर समालोचनाची जबाबदारी पार पाडत आहे.