News Flash

India vs Pakistan Champions Trophy 2017 : भारत पाकिस्तान फायनलचे तिकीट ९१ हजारांच्या घरात!

एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार अवघ्या दोन तासात सगळी तिकीटे संपणार

चॅम्पियन्स ट्रॉफीचा महाअंतिम सामना उद्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात रंगतोय. या सामन्याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. जगभरातले क्रिकेट रसिक या सामन्यात काय होणार याची डोळे लावून वाट पाहात आहेत. उद्या लंडनच्या ओव्हल मैदानावर हा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्याची ९९ टक्के तिकीटे विकली गेली आहेत. तिकीटांसाठी ब्राँझ, सिल्ह्वर, गोल्ड आणि प्लॅटीनम असे विभाग पाडण्यात आले आहेत. पीटर मे स्टँडवरचे तिकीट ९१ हजारांच्या घरात आहे. तर प्लॅटीनम विभागाचे तिकीट ४७ हजारांच्या पुढे आहे. गोल्ड स्टँडसाठीचे तिकीट ३८ हजारांच्या घरात आहे. तर सिल्ह्वर अँड ब्राँझ स्टँडचे तिकीट सुमारे २८ हजारांच्या पुढे आहे.

viagogo.com या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार या सामन्याची अवघी १५० ते २०० तिकीटे शिल्लक आहेत जी येत्या काही तासांमध्ये विकली जातील. या सामन्याची ९९ तिकीटे विकली गेल्याचा दावाही याच वेबसाईटने केला आहे. भारत आणि पाकिस्तानचा हा सामना रोमहर्षक होणार यात काहीही शंकाच नाही. मात्र तिकीटांच्या बाबतीतही या सामन्याने बाजी मारल्याचे दिसून येते आहे. ९१ हजारांच्या पुढे तिकीट असूनही दर्दी क्रिकेटप्रेमींनी हा सामना मैदानात जाऊनच बघायचा असे ठरवलेले आहे. त्यामुळे तिकीटांच्या किंमतीकडे न पाहता आपला छंद जोपासण्याकडेच क्रिकेटप्रेमींचा कल दिसून येतो आहे.

viagogo.com या वेबसाईटवर जर गेलात तर तुम्हाला तिकीटांचे दर, त्यासाठी रांग असे सगळे चित्र पाहता येईल. या मॅचचे एक तिकीट मिळवण्यासाठी १३०० लोक वेबसाईटवर रांगेत आहेत. तर पुढच्या एक ते दोन तासात या सामन्याची सगळी तिकीटे संपतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे उद्या होणारा सामना जेवढा मैदानात रंगणार आहे तेवढाच तो तिकीट काऊंटरवरही रंगला आहे असेच म्हणता येईल.

दरम्यान, भारत-पाकिस्तान सामन्यावर एक दोन नाही तब्बल २ हजार कोटींचा सट्टा लागल्याची बातमी समोर येते आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणारा सामना कायमच जगाच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिला आहे. तसेच भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये हा सामना म्हणजे गौरवाचा विषय आहे. उद्या नेमके काय होणार? याची सोशल मीडियावर आणि विविध कार्यालयांमध्ये तसेच ट्रेनमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 17, 2017 10:13 pm

Web Title: india vs pakistan champions trophy 2017 final tickets cost 91000
Next Stories
1 कॅनडाचं काम तमाम, आता पाकिस्तानशी सामना
2 सामना हॉकीचा, प्रक्षेपण मात्र क्रिकेटचं
3 अंतिम सामन्याआधी भारताच्या अडचणी वाढल्या
Just Now!
X