संगकाराच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर श्रीलंकेने ट्वेन्टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना जिंकत भारतीय गोलंदाजांचे आव्हान मोडून काढले. श्रीलंकेच्या चार फलंदाजांनी १३४ धावांचे विजयी लक्ष पूर्ण केले. आजपर्यंतच्या सर्वच ट्वेन्टी-२० विश्वचषकांमध्ये प्रत्येकवेळी नवा संघ विजयी ठरला आहे. भारताला दुसऱ्यांदा ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकण्याची संधी होती. मात्र, भारतीय गोलंदाजांनी आलेली संधी गमावली.
दरम्यान, विराट कोहलीच्या ७७ धावांच्या तुफान खेळीच्या जोरावर भारताने श्रीलंकेला विजयासाठी १३१ धावांचे लक्ष्य दिले आहे. रहाणे तीन धावांवर बाद झाल्यावर कोणताही दबाव न घेता विराटने श्रीलंकेच्या सर्वच गोलंदाजांना धुलाई दिली. सामन्याच्या शेवच्या चेंडूवर धाव घेताना विराट धावचीत झाला.
श्रीलंकेचा कर्णधार लसिथ मंलिंगा याने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते.  
भारतीय संघ :

महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, विराट कोहली, युवराज सिंग, सुरेश रैना, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अमित मिश्रा, मोहित शर्मा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, वरुण आरोन, स्टुअर्ट बिन्नी आणि शिखर धवन.
श्रीलंका संघ:
लसिथ मलिंगा (कर्णधार), दिनेश चंडिमल, कुशल परेरा, तिलकरत्ने दिलशान, महेला जयवर्धने, कुमार संगकारा, लाहिरू थिरिमाने, अँजेलो मॅथ्यूज, थिसारा परेरा, नुवान कुलसेकरा, सचित्र सेनानायके, सुरंगा लकमल, रंगना हेराथ, अजंथा मेंडिस, सीकुगे प्रसन्ना.
धावफलक:
भारत १३०/४

श्रीलंका १३४/४