नवी दिल्ली : माजी कर्णधार सौरव गांगुलीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यास देशाच्या क्रिकेटची पताका फडकत राहील, अशी प्रतिक्रिया माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मणने मंगळवारी व्यक्त केली.

गांगुलीने सोमवारी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. येत्या २३ ऑक्टोबरला होणाऱ्या निवडणुकीत त्यांची अध्यक्षपदासाठी बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे. याबाबत लक्ष्मणने ‘ट्विटर’वर म्हटले आहे की, ‘‘बीसीसीआयचे भावी अध्यक्ष गांगुलीचे अभिनंदन. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेटचे यश कायम राहील, यात मुळीच शंका नाही. तुझ्या नव्या भूमिकेच्या कारकीर्दीत तुला उत्तम यश मिळावे, यासाठी माझ्या शुभेच्छा!’’

लक्ष्मणला उत्तर देताना गांगुलीने ‘ट्विटर’वर म्हटले की, ‘‘व्हीव्हीएस तुझे आभार. तुझे योगदानसुद्धा महत्त्वाचे असेल.