25 February 2021

News Flash

IPL 2019 : मैदानात ये, खेळ दाखव आणि नाव कमव ! पंतच्या आव्हानाला धोनीचं प्रत्युत्तर

दोघांच्या लढतीत कोण मारणार बाजी?

आयपीएलचा बारावा हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. 23 मार्च रोजी गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सलामीचा सामना रंगणार आहे. Star Sports या वाहिनीने प्रत्येक संघातील महत्वाच्या खेळाडूंना सोबत घेऊन एक जाहीरातीचं कँपेन केलं. यामध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचा खेळाडू ऋषभ पंतने धोनीला, “तू माझ्या गुरुसारखा असलास तरीही मैदानात यंदा मी तुझ्या संघावर इतका बरसेन की पाहत बसशील”, असं आव्हान दिलं.

पंतच्या या आव्हानाला प्रत्युत्तरही धोनीने तितक्याच दमदार पद्धतीने दिलं आहे. धोनीने पंतला मैदानात ये, खेळ दाखव आणि नाव कमव असं आव्हान दिलं आहे. या दोन्ही खेळाडूंमध्ये रंगलेल्या द्वंद्वाचा व्हिडीओ Star Sports ने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे.

त्यामुळे या दोन्ही खेळाडूंच्या लढतीत प्रत्यक्ष मैदानात कोण बाजी मारतंय याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2019 4:22 pm

Web Title: ipl 2019 ms dhoni accepts rishabh pants challenge with a reminder
Next Stories
1 कोहलीचा विजयरथ घरच्या मैदानातच अडखळला
2 Video : ४६ षटकार, ८०७ धावा! इंग्लंड-विंडीजच्या फलंदाजांची ही आतषबाजी एकदा पाहाच
3 IND vs AUS : मालिका गमावली, पण विराटने रचला विश्वविक्रम
Just Now!
X