IPL 2019 मध्ये आज (शुक्रवारी) क्वालिफायर २ सामन्यात दिल्ली आणि चेन्नई या दोन संघामध्ये सामना रंगणार आहे. या सामन्यातील विजेता संघ मुंबईच्या संघाविरुद्ध १२ मे रोजी अंतिम सामना खेळणार आहे. मंगळवारी झालेल्या क्वालिफायर १ मध्ये विजय मिळवून मुंबईच्या संघाने अंतिम सामना गाठला. चेन्नईच्या संघाविरुद्ध झालेल्या क्वालिफायर १ सामन्यात मुंबईने चेन्नईला ६ गडी राखून सहज पराभूत केले. १३२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईच्या सूर्यकुमार यादवने नाबाद अर्धशतकी खेळी केली. या विजयासह मुंबईने पाचव्यांदा स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. त्यामुळे ज्या संघाला अंतिम फेरी गाठायची असेल, त्या संघाने आजचा सामना जिंकणे अनिवार्य आहे.

आजच्या सामन्यात मुख्य द्वंद्व हे धोनी विरुद्ध ऋषभ पंत यांच्यात पाहायला मिळणार आहे. पण दिल्लीच्या संघाला धोनीपेक्षाही चेन्नईचा फलंदाज सुरेश रैना याच्या फलंदाजीएच्या तडाख्यापासून वाचणे हे आव्हान असणार आहे. प्ले ऑफ्स गटात आणि उपांत्य व अंतिम फेरीतील आकडेवारी पाहता महेंद्रसिंग धोनी यांच्यापेक्षाही सुरेश रैना याची फलंदाजी दिल्लीसाठी अधिक धोकादायक ठरू शकते.

सुरेश रैना याने IPL च्या इतिहासात प्ले ऑफ्स गटात खेळताना चेन्नईच्या इतर कोणत्याही खेळाडूंपेक्षा चांगली आणि उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सुरेश रैनाने प्ले ऑफ्स गटात खेळताना एकूण २२ डावात १६०.५१ च्या स्ट्राईक रेटने ६९५ धावा केल्या आहेत. त्यातही प्रथम फलंदाजी करताना त्याने ४३३ धावा ठोकल्या आहेत. त्याच्या तुलनेत धोनीने केवळ १८ डाव खेळले असून त्यात त्याने १३३ च्या स्ट्राईक रेटने ४९३ धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट रैनापेक्षा खूपच कमी आहे.

प्ले ऑफ्स गट / उपांत्य आणि अंतिम सामन्यातील कामगिरी

खेळाडूडावधावाप्रथम फलंदाजीस्ट्राईक रेट
सुरेश रैना२२६९५४४३१६०.५१
महेंद्रसिंग धोनी१८४९३३७०१३३.२४
मायकल हसी११३८८३१२१२४.३६
अंबाती रायडू१७२७७२५८१०७.३६
मुरली विजय१०३६४२४७१४७.३७