01 June 2020

News Flash

IPL 2019 SRH vs KXIP : हैदराबादचा पंजाबवर दमदार विजय

वॉर्नरच्या ८१ धावा; रशीद खान व खलील अहमदचे ३-३ बळी

IPL 2019 SRH vs KXIP Live Updates : हैदराबादच्या संघाने पंजाबवर ४५ धावांनी विजय मिळवला. डेव्हिड वॉर्नरच्या तुफानी ८१ धावांच्या खेळीच्या बळावर हैदराबादने पंजाबपुढे २१३ धावांचे विशाल आव्हान ठेवले होते. पण राहुलच्या (७९) अर्धशतकाच्या जोरावर पंजाबचा संघ ८ बाद १६७ धावांपर्यंतच मजल मारू शकला. रशीद आणि खलीलने ३-३ बळी टिपले पंजाबचा हा गेल्या सहा सामन्यातील पाचवा पराभव ठरला.

२१३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ख्रिस गेल फटकेबाजीच्या प्रयत्नात झेलबाद झाला आणि पंजाबला पहिला धक्का बसला. त्याने ३ चेंडूत एका चौकारासह ४ धावा केल्या. त्यानंतर भागीदारी होत असतानाच मयंक अग्रवाल बाद झाला. त्याने १८ चेंडूत २७ धावा केल्या. फटकेबाजी करणारा धोकादायक फलंदाज निकोलस पूरन झेलबाद झाला. त्याने १० चेंडूत २ चौकार आणि २ षटकारांसह २१ धावा केल्या. डेव्हिड मिलरने फटकेबाजीचा प्रयत्न केला. पण रशीद खानने आधी डेव्हिड मिलर आणि नंतर पंजाबचा कर्णधार अश्विन असे २ चेंडूत २ बळी टिपले. मिलरने ११ चेंडूत ११ धावा केल्या, तर अश्विन पहिल्याच चेंडूवर माघारी परतला.

एकीकडे गडी बाद होत असताना लोकेश राहुलने मोहम्मद नबीच्या गोलंदाजीवर सलग २ षटकार लगावत अर्धशतक पूर्ण केले. लोकेश राहुल राहुल ७९ धावांवर बाद झाला. इतर कोणीही जबाबदारीने फलंदाजी केली नाही. त्यामुळे पंजाबला पराभवाला सामोरे जावे लागले.

त्याआधी आपला अखेरचा सामना खेळणाऱ्या वॉर्नरने पहिल्या विकेटसाठी वृद्धीमान साहासोबत ७८ धावांची भागीदारी केली. साहा (२८) माघारी परतल्यानंतर वॉर्नरने मनिष पांडेच्या साथीने डावाला पुन्हा एकदा आकार दिला. दोन्ही खेळाडूंची पंजाबची गोलंदाजी व्यवस्थित खेळून काढत धावफलक हलता ठेवला. या दरम्यान वॉर्नरने आपलं अर्धशतकही पूर्ण केलं. त्याने ५६ चेंडूत ८१ धावांची खेळी केली. या खेळीत ७ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. रविचंद्रन आश्विनने पांडेला (३६) माघारी धाडत हैदराबादची जमलेली जोडी फोडली.

यानंतर डेव्हिड वॉर्नरही माघारी परतला. मधल्या फळीतल्या फलंदाजांनी यावेळी आपली जबाबदारी ओळखत फटकेबाजी करत संघाला २०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. पंजाबच्या गोलंदाजांनी अखेरच्या षटकांमध्ये चांगली कामगिरी केली, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. पंजाबकडून रविचंद्रन आश्विन आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी २-२ फलंदाजांना माघारी धाडलं. त्यांना अर्शदीप सिंह आणि मुरगन आश्विनने १ बळी घेत चांगली साथ दिली.

लोकसत्ता समालोचन

Live Blog

Highlights

 • 00:02 (IST)

  हैदराबादचा पंजाबवर दमदार विजय

  हैदराबादने पंजाबवर ४५ धावांनी विजय मिळवला. हैदराबादने पंजाबपुढे २१३ धावांचे आव्हान ठेवले होते. पण पंजाबचा संघ ८ बाद १६७ धावांपर्यंतच मजल मारू शकला.

 • 23:10 (IST)

  रशीदचे २ चेंडूत २ बळी, पंजाबचे ५ गडी माघारी

  रशीद खानने आधी डेव्हिड मिलर आणि नंतर पंजाबचा कर्णधार अश्विन असे २ चेंडूत २ बळी टिपले. मिलरने ११ चेंडूत ११ धावा केल्या, तर अश्विन पहिल्याच चेंडूवर माघारी परतला.

 • 21:47 (IST)

  हैदराबादची २१२ धावांपर्यंत मजल

  पंजाबला विजयासाठी २१३ धावांचं आव्हान

 • 21:33 (IST)

  केन विल्यमसन माघारी, हैदराबादला चौथा धक्का

  मोहम्मद शमीने घेतला बळी

 • 21:20 (IST)

  एकाच षटकात पंजाबला दोन धक्के

  रविचंद्रन आश्विनने मनिष पांडे, डेव्हिड वॉर्नरला माघारी धाडत पंजाबला दिलासा दिला

 • 20:56 (IST)

  डेव्हिड वॉर्नरचं अर्धशतक

  अखेरच्या सामन्यातही वॉर्नरची आक्रमक खेळी

 • 20:29 (IST)

  वॉर्नर-साहा जोडीची आश्वासक सुरुवात

  पहिल्या विकेटसाठी दोन्ही फलंदाजांची आक्रमक भागीदारी

00:02 (IST)30 Apr 2019
हैदराबादचा पंजाबवर दमदार विजय

हैदराबादने पंजाबवर ४५ धावांनी विजय मिळवला. हैदराबादने पंजाबपुढे २१३ धावांचे आव्हान ठेवले होते. पण पंजाबचा संघ ८ बाद १६७ धावांपर्यंतच मजल मारू शकला.

23:36 (IST)29 Apr 2019
राहुल ७९ धावांवर बाद; पंजाब पराभवाच्या छायेत

लोकेश राहुल राहुल ७९ धावांवर बाद झाला. त्याने केलेल्या खेळीत ४ चौकार आणि ५ षटकार लगावले.

23:11 (IST)29 Apr 2019
सलग २ षटकार लगावत राहुलचे अर्धशतक

एकीकडे गडी बाद होत असताना लोकेश राहुलने मोहम्मद नबीच्या गोलंदाजीवर सलग २ षटकार लगावत अर्धशतक पूर्ण केले.

23:10 (IST)29 Apr 2019
रशीदचे २ चेंडूत २ बळी, पंजाबचे ५ गडी माघारी

रशीद खानने आधी डेव्हिड मिलर आणि नंतर पंजाबचा कर्णधार अश्विन असे २ चेंडूत २ बळी टिपले. मिलरने ११ चेंडूत ११ धावा केल्या, तर अश्विन पहिल्याच चेंडूवर माघारी परतला.

22:59 (IST)29 Apr 2019
धोकादायक निकोलस पूरन बाद; पंजाबला तिसरा धक्का

फटकेबाजी करणारा धोकादायक फलंदाज निकोलस पूरन झेलबाद झाला. त्याने १० चेंडूत २ चौकार आणि २ षटकारांसह २१ धावा केल्या.

22:47 (IST)29 Apr 2019
मयंक अग्रवाल बाद; पंजाबला दुसरा धक्का

भागीदारी होत असतानाच मयंक अग्रवाल बाद झाला. त्याने १८ चेंडूत २७ धावा केल्या.

22:13 (IST)29 Apr 2019
ख्रिस गेल झेलबाद; पंजाबला पहिला धक्का

२१३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ख्रिस गेल फटकेबाजीच्या प्रयत्नात झेलबाद झाला आणि पंजाबला पहिला धक्का बसला. त्याने ३ चेंडूत एका चौकारासह ४ धावा केल्या.

21:47 (IST)29 Apr 2019
हैदराबादची २१२ धावांपर्यंत मजल

पंजाबला विजयासाठी २१३ धावांचं आव्हान

21:38 (IST)29 Apr 2019
हैदराबादला सहावा धक्का, राशिद खान माघारी

अर्शदीपने घेतला बळी

21:36 (IST)29 Apr 2019
मोहम्मद नबी त्रिफळाचीत, हैदराबादचा निम्मा संघ माघारी परतला

शमीने घेतला सामन्यातला दुसरा बळी

21:33 (IST)29 Apr 2019
केन विल्यमसन माघारी, हैदराबादला चौथा धक्का

मोहम्मद शमीने घेतला बळी

21:20 (IST)29 Apr 2019
एकाच षटकात पंजाबला दोन धक्के

रविचंद्रन आश्विनने मनिष पांडे, डेव्हिड वॉर्नरला माघारी धाडत पंजाबला दिलासा दिला

20:56 (IST)29 Apr 2019
डेव्हिड वॉर्नरचं अर्धशतक

अखेरच्या सामन्यातही वॉर्नरची आक्रमक खेळी

20:43 (IST)29 Apr 2019
हैदराबादला पहिला धक्का, साहा माघारी

मुरगन आश्विनने घेतला बळी, पहिल्या विकेटसाठी दोघांमध्ये ७८ धावांची भागीदारी

20:29 (IST)29 Apr 2019
वॉर्नर-साहा जोडीची आश्वासक सुरुवात

पहिल्या विकेटसाठी दोन्ही फलंदाजांची आक्रमक भागीदारी

19:55 (IST)29 Apr 2019
पंजाबने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

हैदराबादच्या डेव्हिड वॉर्नरचा अखरेचा सामना

टॅग IPL 2019
<p class="appstext"><img src="https://images.loksatta.com/2020/03/telegram-26-03-2020.png" width="24" height="24" style="margin-right:0;"><strong><em>लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल <a onclick="ga( "send", "event", "Telegram_Click", "click", "https://t.me/LoksattaLiveOfficial" );" href="https://t.me/LoksattaLiveOfficial" target="_blank"> (@Loksatta) </a> जॉइन करण्यासाठी <a href="https://t.me/LoksattaLiveOfficial" target="_blank" onclick="ga( "send", "event", "Telegram_Click", "click", "https://t.me/LoksattaLiveOfficial" );"> येथे क्लिक करा </a> आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.</em></strong></p>
Next Stories
1 Video : …आणि मैदानावरच कार्तिक-उथप्पा भिडले
2 Video : पाकच्या हसन अलीचा खोटारडेपणा ! झेल सोडल्यानंतही सेलिब्रेशन केल्याने फलंदाज माघारी
3 IPL 2019 : रसल म्हणतो, ‘बायको माझ्यासाठी लकी चार्म’
Just Now!
X