गेल्या काही वर्षांमध्ये बीसीसीआय आणि पाक क्रिकेट बोर्डामध्ये सुरु असलेल्या द्वंद्वात, पाक क्रिकेट बोर्डाला आयसीसीच्या दरबारात हार पत्करावी लागली. यानंतर चवताळलेल्या पाकिस्तानने आयपीएलच्या बाराव्या हंगामाचे सामने पाकिस्तानात प्रसारित केले जाणार नाहीत असा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानचे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री फवाद अहमद चौधरी यांनी हा निर्णय घेतला आहे. ARY या पाकिस्तानी वृत्तवाहिनीशी बोलत असताना चौधरी यांनी ही माहिती दिली.

“पाकिस्तान सुपर लिग दरम्यान भारतीय कंपन्या आणि सरकारने आम्हाला जी वागणूक दिली, ती पाहता पाकिस्तानमध्ये आयपीएलचे सामने दाखवले जाणार नाहीत. आम्ही क्रिकेट आणि राजकारण या दोन गोष्टी वेगळ्या ठेवण्याचा सतत प्रयत्न केला. मात्र भारताने ‘आर्मी कॅप’ घालून सामना खेळला, ज्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.” चौधरी यांनी आपली बाजू मांडली.

आयपीएलच्या बाराव्या हंगामाला शनिवारपासून सुरुवात होते आहे. पहिल्या सामन्यात गतविजेता चेन्नई सुपरकिंग्ज संघ विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाशी खेळणार आहे. चेन्नईच्या मैदानावर हा सामना रंगणार असल्यामुळे या सामन्याला चाहते मोठ्या प्रमाणात गर्दी करतील अशी आशा सर्वांना आहे.

अवश्य वाचा – IPL 2019 : पहिल्या सामन्यासाठी विराट-धोनी सज्ज, मैदानावर कसून सराव