आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं बिगुल अखेरीस वाजलेलं आहे. २९ मार्चला गतविजेते मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज आपला पहिला सामना खेळणार आहेत. चेन्नई सुपरकिंग्ज आयपीएलमध्ये प्रमुख संघापैकी एक मानला जातो. महेंद्रसिंह धोनी कर्णधार असलेल्या चेन्नई संघाचे जगभरात लाखो चाहते आहेत. चेन्नई आणि मुंबई यांच्यातल्या सामन्याला अनेकदा, भारत-पाक सामन्यांचं स्वरुपही दिलं जातं.

चेन्नई सुपरकिंग्जने आपल्या आगामी हंगामासाठीचं वेळापत्रक सोशल मीडियावर जाहीर केलं आहे.

मार्च महिन्यात भारतीय संघ घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३ वन-डे सामन्यांची मालिका खेळेल. १८ मार्चरोजी कोलकात्यात तिसरा वन-डे सामना खेळवल्यानंतर बरोबर ११ दिवसांनी आयपीएलच्या तेराव्या हंगामाला सुरुवात होणार आहे. तेराव्या हंगामात शनिवारी Double Header सामन्यांची संख्या कमी करण्यात आलेली असून, संपूर्ण हंगामात केवळ ५ Double Header सामने खेळवले जाणार असून ते रविवारी खेळवले जातील. १७ मे रोजी विराट कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ मुंबई इंडियन्सविरुद्ध अखेरचा साखळी सामना खेळणार आहे.

अवश्य वाचा – आयपीएलचं बिगुल वाजलं ! मुंबई-चेन्नईमध्ये रंगणार सलामीची झुंज