IPL 2021साठी सर्व संघांनी कंबर कसली आहे. त्याच पार्श्वभूमीवर गुरूवारी चेन्नईमध्ये IPL 2021साठी लिलाव पार पडला. या लिलावात दरवर्षीप्रमाणेच परदेशी खेळाडूंना मोठा भाव मिळाला. त्यातही वेगवान गोलंदाजांची चांदी झाली. दक्षिण आफ्रिकेचा ख्रिस मॉरिस IPLच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याला राजस्थानने १६ कोटी २५ लाखांना विकत घेतलं. याच लिलावात न्यूझीलंडच्या काइल जेमिसनवर अनपेक्षितपणे बंगळुरूने १५ कोटींची बोली लावली. महत्त्वाचे म्हणजे त्याच्यावर लागलेल्या मोठ्या बोलीनंतर त्याने भन्नाट प्रतिक्रिया दिली.

अर्जुनवर टीका करणाऱ्यांना सारा तेंडुलकरचं सडेतोड उत्तर, म्हणाली…

जेमिसनने स्टफ.को.एनएझ या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत याविषयी त्याने मत व्यक्त केलं. “मी मध्यरात्री उठलो आणि फोन चेक केला. IPL लिलावाचा छान आनंद घ्यावा असा माझा प्लॅन होता, पण सुमारे दीड तास माझं नावंच आलं नाही. जेव्हा माझ्यावर बोली लागली तेव्हा मला (न्यूझीलंडचा माजी गोलंदाज) शेन बॉन्डचा मेसेज आला. लिलाव कसा सुरु आहे हेदेखील मला माहित नव्हतं. १५ कोटींची बोली लागल्यावर मला तर हेदेखील माहिती नव्हतं की १५ कोटी म्हणजे न्यूझीलंडचे किती डॉलर्स असतील? अखेर मी तो विचार सोडून दिला. माझी संघात निवड झाल्याची बातमी मी माझ्या प्रेयसीला व आई वडिलांना सांगितली आणि त्यानंतर झोपून गेलो”, अशी प्रतिक्रिया जेमिसनने दिली.

Video: ‘या’ खेळाडूचा लिलाव अन् सर्वत्र झाला टाळ्यांचा कडकडाट

काइल जेमिसन – १५ कोटी – बंगळुरू

दरम्यान, लिलावात जेमिसन खालोखाल ऑस्ट्रेलियाचा झाय रिचर्डसन याच्यावर १४ कोटींची बोली लागली. त्याला पंजाबने संघात घेतले. याशिवाय गेल्या हंगामातील खराब कामगिरीमुळे टीकेचे लक्ष्य ठरलेला ग्लेन मॅक्सवेल यंदाच्या लिलावात आघाडीवर असल्याचं दिसून आलं. त्याला तब्बल १४ कोटी २५ लाखांना बंगळुरूने आपल्या ताफ्यात सामील करून घेतलं. तर इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोइन अली याला ७ कोटींच्या बोलीवर चेन्नईच्या संघात दाखल करून घेण्यात आले. IPL लिलावाआधी सर्वाधिक चर्चेत असलेल्या अर्जुन तेंडुलकरला मुंबईच्या संघाने मूळ किमतीत विकत घेतले.