हैदराबाद विरुद्ध आक्रमक खेळी करणारा चेन्नईचा आघाडीचा फलंदाज फाफ डु प्लेसिस ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला आहे. दिल्लीच्या शिखर धवनला मागे टाकत त्याने हा मान पटकावला आहे. आतापर्यंत झालेल्या ६ सामन्यात त्याने २७० धावा केल्या आहेत. त्यात नाबाद ९५ धावांची सर्वोत्कृष्ट खेळी आहे. फाफनं ६७.५०च्या सरासरीने या धावा केल्या आहेत. त्यात ३ अर्धशतकांचा समावेश आहे.

दिल्लीचा आघाडीचा फलंदाज शिखर धवन या शर्यतीत दुसऱ्या स्थानावर आहे. सहा सामन्यात त्याच्या एकूण २६५ धावा आहेत. त्यात ९२ धावांची सर्वोत्कृष्ट खेळी आहे. त्याने ४४.१६च्या सरासरीने या धावा केल्या आहेत. यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे. तर पंजाबचा केएल राहुल या शर्यतीत तिसऱ्या स्थानावर त्याने या स्पर्धेत २४० धावा केल्या आहेत. त्यात ९१ धावांची सर्वोत्तम खेळी आहे. त्याच्या खात्यात ३ अर्धशतकांचा समावेश आहे.

डेविड वॉर्नर १० हजार धावा करण्याऱ्या खेळाडूंच्या क्लबमध्ये

बंगळुरुचा हर्षल पटेल अजूनही पर्पल कॅपचा मानकरी आहे. त्याने ६ सामन्यात एकूण १७ गडी बाद केले आहेत. हर्षल पटेलनं मुंबई विरोधात सर्वोत्तम प्रदर्शन करत ४ षटकात २७ धावा देत ५ गडी बाद केले आहेत. दिल्लीचा आवेश खान या शर्यतीत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने एकूण १२ गडी बाद केले आहेत. तर हैदराबादचा राशीद खान तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने एकूण ९ गडी बाद केले आहेत.