News Flash

IPL २०२१ : दिल्लीच्या मैदानात काम करणाऱ्या ५ कर्मचाऱ्यांना करोनाची लागण

या मैदानावर उद्या रंगणार मुंबई-हैदराबाद सामना

फोटो सौजन्य : पीटीआय

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १४व्या हंगामात करोनाने शिरकाव केला आहे. कोलकाताचे दोन खेळाडू करोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जच्या तीन सदस्यांनाही करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे ही स्पर्धा आता कशी पुढे जाईल, याविषयी चिंता निर्माण झाली आहे. आता दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे (डीडीसीए) पाच ग्राउंड कर्मचारी कोरोना संक्रमित असल्याचे आढळले आहे.

जेटली स्टेडियमवर ८ मेपर्यंत आयपीएल सामन्यांचे आयोजन

दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर ८ मेपर्यंत आयपीएल सामन्यांचे आयोजन केले जाणार असून राजस्थान रॉयल्स, चेन्नई सुपर किंग्ज, मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबादसह चार संघ त्यांच्या सामन्यांसाठी दिल्लीत आहेत. जे खेळाडू पॉझिटिव्ह आढळले आहेत, त्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर अखेरचा सामना रविवारी दुपारी राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळवला गेला.

आता या मैदानावर उद्या मंगळवारी (४ मे) रोजी गतविजेत्या मुंबई आणि हैदराबाद यांच्यातील सामन्याचे आयोजन केले जाणार आहे. बीसीसीआयच्या योजनेनुसार सामने होणार की नाही हे पाहणे बाकी आहे. Espn Cricinfoने दिलेल्या वृत्तानुसार, सीएसकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथ, गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी आणि बसचा क्लीनर यांना करोनाने ग्रासले आहे. याव्यतिरिक्त दिल्लीत असलेला उर्वरित संघ करोना चाचणीत निगेटिव्ह आढळला आहे. या सर्वांची शेवटची चाचणी रविवारी घेण्यात आली होती. या चाचणीचा अहवाल आता समोर आला आहे.

कोलकाता-बंगळुरू सामना स्थगित

आयपीएल २०२१स्पर्धेत आज कोलकाता नाइटराइडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सामना रंगणार होता. मात्र या सामन्यापूर्वी दोन खेळाडूंना करोनाची लागण झाल्याने सामना पुढे ढकलण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2021 6:25 pm

Web Title: ipl 2021 five ddca groundsmen test positive for coronavirus report adn 96
Next Stories
1 ‘‘…तुमची हिंमत कशी झाली?”, IPLच्या समालोचकाचे पंतप्रधानांना खडे बोल
2 धोनीच्या घरात नव्या पाहुण्याचे आगमन, पत्नी साक्षीने दिली माहिती
3 IPL २०२१ : ‘‘कदाचित वॉर्नरला आपण शेवटचं हैदराबादच्या जर्सीत पाहत आहोत”
Just Now!
X