मागील काही सामन्यात फ्लॉप ठरलेला मुंबई इंडियन्स संघ आज चेन्नईच्या चेपॉक मैदानावर पंजाब किंग्जविरुद्ध सामना खेळतो आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून पंजाबने मुंबईला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मात्र, मुंबईसाठी हा निर्णय चांगला ठरला नाही. यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबईने पहिल्या ६ षटकांच्या पॉवरप्लेमध्ये सर्वात कमी धावा करण्याचा लाजिरवाणा विक्रम नोंदवला.

पहिल्या ६ षटकांच्या पॉवरप्लेमध्ये मुंबईने फक्त २१ धावा केल्या. या दरम्यान मुंबईने सलामीवीर फलंदाज क्विंटन डि कॉकला गमावले. सामन्याच्या दुसऱ्याच षटकात डि कॉकने दीपक हुडाला फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पण, हेन्रिक्सने त्याचा झेल टिपला. डि कॉकला 3 धावा करता आल्या. पॉवरप्लेनंतर किशनही १७ धावात केवळ ६ धावा करून बाद झाला.

 

आतापर्यंत पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात 26 सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी मुंबईने 14 वेळा, तर पंजाब 12 सामने जिंकण्यात यशस्वी झाला आहे. पंजाबचा कर्णधार केएल राहुलच्या नेतृत्वात चारपैकी केवळ एक सामना जिंकला आहे. दुसरीकडे मुंबईला अखेरच्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते. मुंबईने 4 पैकी केवळ 2 सामने जिंकले आहेत.

आयपीएलमध्ये मुंबईच्या पॉवरप्लेमध्ये कमी धावा

  • १७/३ वि. पंजाब मुंबई २०१५
  • २१/२ वि. पंजाब विशाखापट्टणम २०१६
  • २१/४ वि. बंगळुरू बंगळुरू २०१७
  • २१/१ वि. पंजाब चेन्नई २०२१*