सनरायजर्स हैदराबाद

* कर्णधार : डेव्हिड वॉर्नर</p>

* सर्वोत्तम कामगिरी  : विजेतेपद (२००९, २०१६)

* मुख्य आकर्षण : जेसन रॉय

गेल्या सलग पाच हंगामांत बाद फेरी गाठणारा एकमेव संघ म्हणजे सनरायजर्स हैदराबाद. डेव्हिड वॉर्नर, जॉनी बेअरस्टो, केन विल्यम्सन अशा नामांकित फलंदाजांनी सजलेल्या आघाडीच्या फळीत आता जेसन रॉयची भर पडल्यामुळे हैदराबादचा संघ धोकादायक ठरू शकतो. भुवनेश्वर कुमार, थंगरासू नटराजन ही भारतीय वेगवान गोलंदाजांची जोडीही लयीत असल्यामुळे हैदराबादच्या चमूत आनंदाचे वातावरण आहे. मधल्या फळीतील सुदृढता आणण्यासाठी अनुभवी केदार जाधवला संघात स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे मनीष पांडे, प्रियम गर्ग, अब्दुल समद यांच्यावरील ताण कमी झाला आहे. अफगाणिस्तानच्या फिरकी त्रिकुटापैकी रशीद खान कोणत्याही क्षणी सामन्याचे रूप पालटू शकतो. त्यामुळे हैदराबादने या वेळी तिसऱ्यांदा जेतेपदाचा चषक उंचावल्यास कोणालाही आश्चर्य वाटणार नाही.

संघ : डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, केन विल्यम्सन, जेसन होल्डर, रशीद खान, मुजीब उर रहमान, मोहम्मद नबी, मनीष पांडे, वृद्धिमान साहा, विजय शंकर, अब्दुल समद, केदार जाधव, प्रियम गर्ग, भुवनेश्वर कुमार, थंगरासू नटराजन, संदीप शर्मा, खलिल अहमद, बसिल थम्पी, सिद्धार्थ कौल, अभिषेक शर्मा, जगदीश सुचित, शाहबाझ नदीम, विराट सिंग, श्रीवत्स गोस्वामी. ल्ल मुख्य प्रशिक्षक : ट्रेव्हर बेलिस.