भारतात सुरु असणाऱ्या ISSF shooting World Cup स्पर्धेत भारताचा १६ वर्षीय नेमबाज सौरभ चौधरी याने रविवारी विश्वविक्रम करत सुवर्णपदक मिळवले. १० मीटर एअर पिस्टल पुरुष गटात त्याने २४५ गुण कमवले आणि थेट ऑलिम्पिकचे तिकीट मिळवले. या सुवर्णकमाईमुळे भारताच्या खात्यात दुसरे सुवर्णपदक जमा झाले. शनिवारी अपूर्वी चंदेला हिने १० मी. एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक पटकावले होते. त्यानंतर वरिष्ठ गटात नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत सहभागी होत सौरभने ही कामगिरी केली.

सौरभने आशियाई स्पर्धेतही १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदक पटकावले होते. त्यावेळी त्याने २४०.७ गुण मिळवले होते. त्यानंतर अवघ्या १६व्या वर्षाच्या सौरभने भारताला विश्वचषक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकून दिले. सौरभ प्रथमच वरिष्ठ आंतरराष्ट्रीय नेमबाजी गटात सहभागी झाला होता आणि त्याने इतिहास रचला. त्याने २४५ गुण मिळवले आणि आपल्या प्रतिस्पर्ध्यांना पराभूतक केले. या स्पर्धेत सर्बियाच्या दामीर मायकेसने २३९.३ गुणांसह रौप्य पदक तर चीनच्या पँग वेईने २१५.२ गुणांसह कांस्यपदक पटकावले.