रोम : स्पेनच्या राफेल नदालने त्याला लाल मातीचा अनभिषिक्त सम्राट म्हणून का ओळखले जाते, हे पुन्हा एकदा सिद्ध केले. रविवारी मध्यरात्री झालेल्या इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात नदालने कट्टर प्रतिस्पर्धी सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचचा पराभव केला.

दुसऱ्या मानांकित नदालने अग्रमानांकित जोकोव्हिचला ७-५, १-६, ६-३ असे तीन सेटमध्ये नमवले. नदालचे हे कारकीर्दीतील १०वे इटालियन जेतेपद ठरले. या जेतेपदासाठी दोन आठवडय़ांनी सुरू होणाऱ्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेसाठी आपण सज्ज असल्याचा इशारा नदालने दिला.