इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसननं लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानात नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. कसोटी सामन्यात ३५ हजाराहून अधिक चेंडू टाकण्याचा विक्रम केला आहे. अशी कामगिरी करणारा तो पहिला वेगवान गोलंदाज असून चौथा गोलंदाज आहे. अँडरसनपूर्वी अशी कामगिरी तीन फिरकीपटूंच्या नावावर आहे. श्रीलंकेच्या मुथैया मुरलीधरनने ४४,०३९, भारताच्या अनिल कुंबलेने ४०,८५० चेंडू, तर ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉर्नने ४०,७०५ चेंडू टाकले आहेत.

वेगवान गोलंदाजांमध्ये वेस्ट इंडिजच्या कर्टनी वॉल्श (३०,०१९ ) पाचव्या, इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉड (२९,८६३ ) सहाव्या, तर ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्ग्राने (२९,२४८) सातव्या स्थानावर आहेत. तर डेनियल विटोरी (२८,८१४) आठव्या, हरभजन सिंह (२८,५८०) नवव्या आणि कपिल देव (२७,७४०) दहाव्या स्थानावर आहे.

जेम्स अँडरसने आतापर्यंत १६४ सामने खेळला आहे. त्यात त्याने ३५ हजाराहून अधिक चेंडू टाकले आहेत. यात त्याने १६ हजार ५५४ धावा दिल्या आहेत. तर ६२३ गडी बाद केले. त्याने दोन्ही कसोटीतील दोन्ही डावात ३० वेळा ५ गडी, तर ३ वेळा १० गडी बाद केले आहेत.