बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात भारताच्या बुमराहने यजमान ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजाची दाणादाण उडवली. बुमरहाने ६ गडी बाद करत ऑस्ट्रेलियाचा संघ १५१ धावांत गारद केला. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर भारतीय गोलंदाजाकडून केलेली ही उत्कृष्ट कामगिरी झाली आहे. या कामगिरीसह बुमराहने ४१ वर्षापूर्वीचा विक्रम मोडीत काढला आहे. या आधी या मैदानावर भारताच्या बीएस चेंद्रशेखर यांनी १९७७ मध्ये ५२ धावांच्या मोबदल्यात सहा गडी बाद केले होते. बुमराहने हा विक्रम मोडीत काढला आहे. बुमराहाने ३३ धावांच्या मोबदल्यात सहा गडी बाद केले आहेत. तिसऱ्या सामन्यावर भारतीय संघाने पकड मिळवली आहे. भारताकडे तब्बल २९२ धावांची आघाडी आहे.

बुमराहाने हॅरीस, शॉन मार्श, ट्रेव्हिस हेड, टिम पेन, लिऑन आणि हेजलवूड यांना बाद केले. बुमराहने १५.५ षटकांमध्ये ३३ धावांच्या मोबदल्यात सहा गडी बाद केले आहेत. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवरील आतापर्यंतची ही सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. ऑस्ट्रेलियातील ही भारतीय गोलंदाजाची चौथी सर्वोत्तम कामगिरी आहे. या विक्रमात कपिल देव ( ८/१०६), अनिल कुंबळे (८/१४१) हे आघाडीवर आहेत.  बुमराहने आतापर्यंत ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात पाच डावांत १७ बळी घेतले आहेत.

 बुमराहाने केलेल्या या कामगिरीची सोशल मिडीयावर कौतुक होत आहे. बुमराहा हा गोलंदाजातील विराट कोहली असल्याचे मत एका चाहत्याने व्यक्त केले आहे. या शिवाय विरेंद्र सोहवाग, आकाश चोप्रा , लक्ष्मण यांनीही ट्विट करत कौतुकाची थाप टाकली आहे.

बुमराहाने सहा बळी घेत ऑस्ट्रेलियाला १५१ धावांत गारद केले. बॉग्सिंग डेचा तिसरा दिवस भारतीय गोलंदाजांनी गाजवला. बुमराहाने सहा बळी घेतले. तर जाडेजा २ आणि इशांत आणि शामीने प्रत्येकी एक-एक बळी घेत बुमराहाला चांगली साथ दिली. पहिल्या डावात ऑस्ट्रेलिया अद्याप २९२ धावांनी पिछाडीवर आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यावर आतापर्यंत भारतीय संघाने वर्चस्व राखले आहे. फलंदाजांच्या दमदार कामगिरीनंतर गोलंदाजांनी आपली कामगिरी चोख बजावली आहे.