तब्बल नऊ वर्षांचा जेतेपदांचा दुष्काळ संपवत अर्सेनेलने हल सिटीवर ३-२ अशी निसटती मात करत एफए चषक फुटबॉल स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरले. कुठल्याही मोठय़ा स्पर्धेच्या अंतिम फेरीत पहिल्यांदाच खेळणाऱ्या हल सिटीने २-० अशी आघाडी घेत दमदार आगेकूच केली. मात्र सँटी काझरेला आणि लॉरेन्ट कोसइमीने गोल करत अर्सेनेलला बरोबरी करून दिली.
निर्धारित वेळेत मुकाबला बरोबरीत सुटला. अतिरिक्त वेळेत आरोन रामसेने दिमाखदार गोल करत अर्सेनेलच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. ‘‘स्पर्धेतील बहुतांशी सामन्यांच्या पहिल्या सत्रात आम्ही प्रतिस्पर्धी संघाला गोल करू दिले. मात्र प्रत्येक वेळी पुनरागमन करण्यात आम्ही यश मिळवले. संघाला जेतेपद मिळवून देणारा गोल करण्याचे मी स्वप्न पाहिले होते. या गोलने ते प्रत्यक्षात साकारले,’’ असे रामसेने सांगितले. यंदाच्या हंगामातला रामसेचा हा १६वा गोल होता. व्यवस्थापक अर्सेन वेन्गर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध संघांनी मिळून पाच एफए चषकावर कब्जा
केला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 19th May 2014 रोजी प्रकाशित
अर्सेनेल अजिंक्य
तब्बल नऊ वर्षांचा जेतेपदांचा दुष्काळ संपवत अर्सेनेलने हल सिटीवर ३-२ अशी निसटती मात करत एफए चषक फुटबॉल स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरले.

First published on: 19-05-2014 at 07:21 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Julian draxler may be arsenals next outside the box