सध्या देश लॉकडाउनमध्ये आहे. करोना विषाणूने सध्या जगभरात दहशत निर्माण केली आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. करोनाचा फटका क्रीडा विश्वालाही बसला असून बहुतांश क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. भारतातील लोकप्रिय IPL स्पर्धादेखील अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. काही खेळाडू IPL खेळवण्याच्या बाजूने आहेत, तर काहींना अशा कठीण प्रसंगी IPL खेळवलं जाऊ नये असं वाटत आहे. पण सध्या तरी खबरदारीचा उपाय म्हणून IPL चे आयोजन अनिश्चित काळासाठी लांबणीवर ढकलण्यात आले आहे.

“एकाच वेळी दोन सामने असल्यास विराटपेक्षा रोहितचा सामना बघेन, कारण…”

IPL चे आयोजन पुढे ढकलण्यात आल्याने सर्व क्रिकेटपटू घरात आहेत. ते सोशल मिडिया आणि लाइव्ह चॅटच्या माध्यमातून एकमेकांशी व चाहत्यांशी संपर्क साधताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी भारताचा कर्णधार विराट कोहली आणि आफ्रिकेचा एबी डीव्हिलियर्स यांनी एकत्र लाइव्ह चॅट केलं. त्यानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याने ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर याच्याशी इन्स्टाग्राम लाइव्हच्या माध्यमातून संवाद साधला. त्यानंतर आता राजस्थान रॉयल्स संघातील इंग्लडचा गोलंदाज जोफ्रा आर्चर आणि न्यूझीलंडचा फिरकीपटू ईश सोधी या दोघांनी लाईव्ह चॅट दरम्यान क्रिकेटच्या गप्पा मारल्या.

रैनाच्या मागणीवर BCCI चं रोखठोक उत्तर

राजस्थान रॉयल्स संघाने गेल्या हंगामात चांगली कामगिरी केली होती, त्यात जोफ्रा आर्चरचा मोठा वाटा होता. लाइव्ह चॅट दरम्यान ईश सोधीने आर्चरला ‘टी २० मध्ये गोलंदाजी करण्यास सर्वात कठीण फलंदाज कोण?’ असं विचारलं. आर्चरने क्षणाचाही विलंब न लावता लोकेश राहुलचं नाव घेतलं.

T20 World Cup : धोनी, धवन संघाबाहेर; समालोचकाने जाहीर केला संघ

धोनीच्या प्लॅनिंगपुढे पॉन्टींगही फिका – माईक हसी

“लोकेश राहुल हा सर्वात धोकादायक फलंदाज आहे. तो अतिशय प्रतिभावान आहे. आपण पंजाबासोबत सामना खेळताना त्याने दोन-तीन वेळा माझी चांगलीच धुलाई केली होती, त्यामुळे तो सोडून मी इतर कोणाचं नाव घेऊच शकत नाही. मी टाकलेल्या विविध प्रकारच्या चेंडूवर योग्य फटके मारण्याची कला त्याच्याइतकी कोणालाच अवगत नाही असं मला वाटतं. खूप वेळा त्याने हे सिद्ध केलं आहे”, असं आर्चरने थेट कबूल करून टाकलं.