जगभरात सध्या करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे भीतीचे वातावरण आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहेत आणि उपाययोजना करण्यात येत आहेत. करोनाचा फटका क्रीडा विश्वालाही बसला असून बहुतांश क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. अशा परिस्थितीत करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्व क्रिकेटपटू चाहत्यांना घरी बसण्याचे आवाहन करत आहेत. घरबसल्या काही क्रिकेटपटू पूर्णपणे आपल्या कुटुंबाला वेळ देत आहेत, तर काही क्रिकेटपटू सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह आहेत. सध्या टिकटॉक आणि इतर प्रकारचे व्हिडीओ तयार करून स्वत:चे आणि चाहत्यांचे मनोरंजन करणारे क्रिकेटपटू लक्ष वेधून घेत आहेत.

“…तर विराट गोलंदाजाला घाणेरड्या शिव्या देतो”

भारताचा तडाखेबाज फलंदाज लोकेश राहुल याने ट्विटरवर प्रश्नोत्तरांचं सत्र घेतलं. त्यात अनेकांनी त्याला प्रश्न विचारले. पवन कुमार या युझरने त्याला प्रश्न विचारला की १४ चेंडूत IPL मधील सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रम तुझ्या (राहुल) नावावर आहे. पण आंतरराष्ट्रीय टी २० क्रिकेटमधील १२ चेंडूत सर्वात जलद अर्धशतकाचा विक्रम युवराजच्या नावे आहे. तो विक्रम कोण तोडू शकेल असं तुला वाटतं?

त्यावर लोकेश राहुलने दमदार उत्तर दिलं. राहुल म्हणाला की युवराजचा सर्वात जलद टी २० अर्धशतकाचा विक्रम मीच मोडेन… या उत्तरानंतर त्याने चिडवण्याचा इमोजीदेखील वापरला.

लोकेश राहुल सर्वात धोकादायक फलंदाज

“लोकेश राहुल हा सर्वात धोकादायक फलंदाज आहे. तो अतिशय प्रतिभावान आहे. आपण पंजाबासोबत सामना खेळताना त्याने दोन-तीन वेळा माझी चांगलीच धुलाई केली होती, त्यामुळे तो सोडून मी इतर कोणाचं नाव घेऊच शकत नाही. मी टाकलेल्या विविध प्रकारच्या चेंडूवर योग्य फटके मारण्याची कला त्याच्याइतकी कोणालाच अवगत नाही असं मला वाटतं. खूप वेळा त्याने हे सिद्ध केलं आहे”, असं इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याने लाइव्ह चॅटमध्ये दोन दिवसांपूर्वी कबूल केलं.