किंगच्या निर्णायक गोलने २-१ असा विजय

खेळाची मरगळलेली शैली, चॅम्पियन्स लीग स्पध्रेच्या गटातून गुंडाळावा लागलेला गाशा या नकारात्मक गोष्टींमुळे टीकाकारांनी तलवारीच्या धारेवर धरलेल्या मँचेस्टर युनायटेडने रविवारी आणखी एका पराजयाचा पाढा गिरवला. इंग्लिश प्रीमिअर लीग (ईपीएल) फुटबॉल स्पध्रेच्या गुणतालिकेत १६व्या स्थानावर असलेल्या दुबळ्या एएफसी बोर्नमाऊथ संघाने सद्य:स्थितीत केवळ कागदावर बलाढय़ असलेल्या युनायटेडला २-१ असा पराभवाचा झटका दिला. जोशुआ किंगने ५४व्या मिनिटाला केलेला गोल बोर्नमाऊथच्या विजयात निर्णायक ठरला. ज्युनियर स्टॅलिस्लासने (२ मि.) बोर्नमाऊथची बोहनी केली, तर युनायटेडकडून मारौने फेलानीने (२४ मि.) गोल केला.

इतर निकाल –
क्रिस्टल पॅलेस : १ (योहान कॅबेय ३८ मि.) विजयी वि. साऊदॅम्पटन : ०.
मँचेस्टर सिटी : २ (विलफ्रिड बोनी २६ मि., केलेची आयहीनाचो ९०+ मि.) विजयी वि. स्वानसी सिटी : १ (बॅफेटीम्बी गोमीस ९० मि.)
नार्विच सिटी : १ (वेस हूलाहन ४७ मि.) बरोबरी वि. एव्हर्टन : १ (रोमेलू लुकाकू १५ मि.)

निर्णायक गोल करणाऱ्या जोशुआ किंगभोवती (१७ क्रमांक) घेराव घालून सहकाऱ्यांनी विजयाचा आनंद साजरा केला.