26 January 2021

News Flash

श्रीलंकेच्या संघात मॅथ्यूजचे पुनरागमन

इंग्लंडविरुद्ध आजपासून पहिली कसोटी

(संग्रहित छायाचित्र)

 

गॉल येथे गुरुवारपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेच्या २२ सदस्यीय संघात अँजेलो मॅथ्यूजला पुनरागमनाची संधी देण्यात आली आहे.

मांडीला झालेल्या दुखापतीमुळे ३३ वर्षीय माजी कर्णधार मॅथ्यूज दक्षिण आफ्रिका दौऱ्याला मुकला होता. दिमुथ करुणारत्नेच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेचा संघ क्रीडामंत्री नमल राजपक्षे यांनी संमत केला. दुसरा कसोटी सामना २२ जानेवारीपासून सुरू होणार असून, हे दोन्ही सामने प्रेक्षकांविना होणार आहेत.

श्रीलंकेचा संघ :

दिमुथ करुणरत्ने (कर्णधार), कुशल परेरा, दिनेश चंडिमल, कुशल मेंडिस, अँजेलो मॅथ्यूज, ओशादा फर्नाडो, निरोशान डिक्वेला, मिनोद भानुका, लाहिरू थिरिमाने, लसिथ ईम्बुलडेनिया, दिलरुवान परेरा, सुरंगा लकमल, लाहिरू कुमारा, विश्वा फर्नाडो, दुश्मंता चामीरा, दसून शनाका, असिथा फर्नाडो, रोशेन सिल्व्हा, लक्षण संदाकान, न्यूवान प्रदीप, रमेश मेंडिस.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2021 12:14 am

Web Title: mathews returns to sri lanka squad abn 97
Next Stories
1 वानखेडेवर अझरुद्दीनचे वादळ!
2 काय आहे ब्रिस्बेनमधल्या टेस्टचा इतिहास? भारताला विजयाची कितपत संधी? जाणून घ्या….
3 चौथ्या कसोटीआधी जोश हेझलवूडची टीम इंडियावर मानसिक दबाव टाकण्याची खेळी
Just Now!
X