News Flash

तिरंगी मालिकेत भारत अ संघाची विजयी सलामी, वेस्ट इंडिजवर ७ गडी राखून मात!

मयांक अग्रवालची शतकी खेळी

मयांकची शतकी खेळी

सलामीवीर मयांक अग्रवालने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर भारत अ संघाने तिरंगी मालिकेत वेस्ट इंडिजच्या संघावर मात केली आहे. ५० षटकात २२२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असलेल्या भारतीय संघाने मयांक अग्रवालच्या शतकी खेळीच्या जोरावर १०२ चेंडूंमध्ये ११२ धावांची आक्रमक खेळी केली. त्याआधी गोलंदाजीत भारताच्या दिपक चहरने १० षटकात २७ धावा देत ५ फलंदाजांना माघारी धाडलं. चहरने केलेल्या भेदक माऱ्याच्या जोऱ्यावर भारताने वेस्ट इंडिजला कमी धावसंख्येत रोखलं.

२७ वर्षीय मयांकने आपल्या शतकी खेळीत ११ चौकार आणि २ षटकार लगावले. दुसऱ्या विकेटसाठी शुभमन गिलसोबत मयांक अग्रवालने १४८ धावांची भागीदारीही रचली. शुभमन गिलनेही ५८ धावांची नाबाद अर्धशतकी खेळी केली. मयांक्र अग्रवाल माघारी परतल्यानंतर श्रेयस अय्यरही अवघ्या एका धावेवर माघारी परतला. मात्र यानंतर ऋषभ पंत आणि शुभमन गिल यांनी संघाची अधिक पडझड होणार नाही याची काळजी घेतली. ३८.१ षटकांतच भारताने वेस्ट इंडिजने दिलेलं आव्हान पूर्ण केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 26, 2018 3:44 pm

Web Title: mayank agarwal deepak chahar power india a to a seven wicket win over west indies a
टॅग : India A,Mayank Agrawal
Next Stories
1 टीम इंडियासोबत अर्जुन तेंडुलकरचा सराव, शास्त्री गुरुजींचा अर्जुनला मोलाचा सल्ला
2 Video: फुटबॉलच्या मैदानात शिरला कांगारु, पकडण्यासाठी पोलिसांची तारांबळ
3 FIFA World Cup 2018: इराणला बरोबरीत रोखत पोर्तुगाल बादफेरीत
Just Now!
X