मागील हंगामात युरोपमधील सर्वाधिक गोल करण्याचा पराक्रम करणाऱ्या फुटबॉलपटू लिओनेल मेसीने विक्रमी पाचव्यांदा ‘गोल्डन शू’ पुरस्कारावर नाव कोरले.

आक्रमणपटू मेसीने बार्सिलोनासाठी ६८ सामन्यांत ३४ गोल नोंदवले. लिव्हरपूलचा मोहम्मद सलाह आणि टॉटेनहॅमच्या हॅरी केनला मागे टाकून मेसीने हा पुरस्कार पटकावला. आतापर्यंत चार वेळा हा पुरस्कार जिंकणाऱ्या ख्रिस्तियानो रोनाल्डोने रेयाल माद्रिदसाठी ५२ सामन्यांत २६ गोल झळकावले आहेत.

या शानदार कार्यक्रमाला बार्सिलोना संघाचे अध्यक्ष जोसेप मारिया बाटरेमेऊ यांच्यासह सहकारी खेळाडू सर्जिओ बसक्वेट्स आणि सर्जी रॉबटरे उपस्थित होते.