मुंबईने राजस्थानवर ७ गडी राखून विजय मिळवला आहे.या विजयासह आयपीएल गुणतालिकेत चौथं स्थान कायम राखण्यात यश आलं आहे. मुंबई इंडियन्सचा स्पर्धेतील तिसरा विजय आहे. तर राजस्थानच्या संघ सातव्या स्थानावर आहे. या पराभवामुळे राजस्थानचा पुढचा प्रवास कठीण होत चालला आहे. राजस्थाननं ६ पैकी ४ सामने गमावले आहेत.

मुंबईचा डाव

राजस्थाननं मुंबईसमोर विजयासाठी १७२ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. आघाडीला आलेल्या रोहित शर्मा आणि क्विंटन डि कॉकनं संघाला चांगली सुरुवात करुन दिली. मात्र रोहित मोठी धावसंख्या उभारण्यास उपयशी ठरला. त्याने १७ चेंडूत १४ धावा केल्या. मात्र क्विंटननं एक बाजू सावरून धरली. त्याने ५० चेंडूत नाबाद ७० धावांची खेळी केली. तर कृणाल पंड्यानेही त्याला चांगली साथ दिली. त्याने २६ चेंडूत ३९ धावांची खेळी केली. राजस्थानकडून ख्रिस मॉरिसनं दोन तर मुस्ताफिजुर रहमाननं १ गडी बाद केला. या व्यतिरिक्त एकाही गोलंदाजाला मुंबईचा फलंदाज बाद करण्यात यश आलं नाही.

राजस्थानचा डाव

राजस्थानला आघाडीच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात करून दिली. मात्र मोठी धावसंख्या उभारण्यात कर्णधार संजू सॅमसन आणि शिवम दुबे यांना अपयश आलं. त्यामुळे १७१ धावांपर्यंत मजल मारता आली. जोस बटलरने ३२ चेंडूत ४१ धावा केल्या. त्यात ३ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश आहे. यशस्वी जयस्वाल २० चेंडूत ३२ धावा करून तंबूत परतला. राहुल चाहरनं आपल्याच गोलंदाजीवर त्याच्या झेल घेत तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर कर्णधार संजू सॅमसनकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र २७ चेंडूत ४२ धावा करून तो तंबूत परतला. ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर त्रिफाळाचीत झाला. तर शिवम दुबे ३५ धावा करत तंबूत परतला. जसप्रीत बुमराहने आपल्याच गोलंदाजीवर त्याचा झेल घेत बाद केलं. राहुल चाहरने ४ षटकात ३३ धावा देत २ गडी बाद केले.

दोन्ही संघातील ११ खेळाडू

राजस्थान- संजू सॅमसन (कर्णधार), जोस बटलर, यशस्वी जयस्वाल, डेविड मिलर, शिवम दुबे, राहुल तेवतिया, रियान पराग, ख्रिस मॉरिस, जयदेव उनाडकट, चेतन सकारिया, मुस्ताफिजुर रहमान

मुंबई- रोहित शर्मा (कर्णधार), क्विटन डि कॉक, सूर्यकुमार यादव, किरॉन पोलार्ड, हार्दीक पंड्या, कृणाल पंड्या, नाथन कल्टर नायल, जयंत यादव, राहुल चाहर, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट

Live Blog

19:06 (IST)29 Apr 2021
मुंबई इंडियन्सचा विजयी चौकार

मुंबईने राजस्थानवर ७ गडी राखून विजय मिळवला आहे.

19:02 (IST)29 Apr 2021
मुंबई इंडियन्सची विजयाकडे वाटचाल

मुंबईला विजयासाठी ९ धावांची आवश्यकता

18:53 (IST)29 Apr 2021
मुंबईला तिसरा धक्का

कृणाल पंड्या ३९ धावा करून बाद

18:47 (IST)29 Apr 2021
कृणाल पंड्या आणि डी कॉकची ५० धावांची भागिदारी

डी कॉकच्या ४५ चेंडूत ६२ धावा

18:25 (IST)29 Apr 2021
डि कॉकची अर्धशतकी खेळी

डि कॉकने ३५ चेंडूत ५० धावा केल्या. यात ५ चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे.

18:15 (IST)29 Apr 2021
मुंबईला दुसरा धक्का

सूर्यकुमार यादव १६ धावा करून तंबूत परतला आहे. ख्रिस मॉरिसच्या गोलंदाजीवर जोस बटलरने त्याचा झेल पकडला.

17:54 (IST)29 Apr 2021
मुंबईला पहिला धक्का

रोहित शर्मा १२ धावा करून तंबूत परतला आहे. ख्रिस मॉरिसच्या गोलंदाजीवर चेतन साकरियाने त्याचा झेल पकडला.

17:48 (IST)29 Apr 2021
मुंबईच्या ५ षटकात बिनबाद ३६ धावा

रोहित शर्मा धावा १२*, तर डि कॉकच्या २३* धावा

17:35 (IST)29 Apr 2021
रोहित शर्मा आणि डि कॉक यांची सावध खेळी

रोहित शर्मा आणि डि कॉक यांनी खेळाची सावध सुरुवात केली आहे.

17:12 (IST)29 Apr 2021
मुंबईसमोर विजयासाठी १७२ धावांचं लक्ष्य

राजस्थाननं ४ गडी गमवून १७१ धावा केल्या.

17:03 (IST)29 Apr 2021
राजस्थानला चौथा धक्का

शिवम दुबे ३५ धावा करून बाद झाला. जसप्रीत बुमराहने आपल्या गोलंदाजीवर त्याचा झेल घेत बाद केलं

16:57 (IST)29 Apr 2021
राजस्थान रॉयल्सला तिसरा धक्का

संजू सॅमसन ४२ धावा करून तंबूत परतला. ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर त्रिफाळाचीत

16:50 (IST)29 Apr 2021
सॅमसन आणि दुबेची ५० धावांची भागिदारी

संजू सॅमसनच्या ३९* तर शिवम दुबेच्या  २५* धावा

16:36 (IST)29 Apr 2021
राहुल चाहरची चांगली गोलंदाजी

राहुल चाहरने ४ षटकात ३३ धावा देत २ गडी बाद केले.

16:26 (IST)29 Apr 2021
राजस्थानच्या १२ षटकात २ गडी गमवून १०० धावा

संजू सॅमसन १९* तर शिवम दुबे 6*

16:18 (IST)29 Apr 2021
राजस्थानला दुसरा धक्का, यशस्वी जयस्वाल बाद

यशस्वी जयस्वाल २० चेंडूत ३२ धावा करून तंबूत परतला आहे. राहुल चाहरनं आपल्याच गोलंदाजीवर त्याच्या झेल घेत तंबूचा रस्ता दाखवला

16:09 (IST)29 Apr 2021
राजस्थानला पहिला धक्का; जोस बटलर तंबूत

जोस बटलर ३२ चेंडूत ४१ धावा करून तंबूत परतला. राहुल चाहरच्या गोलंदाजीवर डि कॉकनं त्याचा झेल घेतला. त्याने ३ चौकार आणि ३ षटकाराच्या मदतीने ४१ धावा केल्या.

16:04 (IST)29 Apr 2021
राजस्थानच्या ५० धावा

जोस बटलर आणि यशस्वी जयस्वालची ५० धावांची भागिदारी

15:53 (IST)29 Apr 2021
राजस्थानची सावध खेळी

पहिल्या ५ षटकात बिनबाद ३३ धावा

15:49 (IST)29 Apr 2021
२०१४ नंतर मुंबई राजस्थानविरोधात पहिल्यांदा विजयी लक्ष्य गाठणार
15:43 (IST)29 Apr 2021
राजस्थानच्या तीन षटकात १९ धावा

जोस बटलर ११ तर यशस्वी जयस्वालची ८ धावा

15:40 (IST)29 Apr 2021
राजस्थानच्या दुसऱ्या षटकात ११ धावा

जोस बटलर १० तर यशस्वी जयस्वालची १ धाव

15:35 (IST)29 Apr 2021
राजस्थानच्या पहिल्या षटकात ५ धावा

जोस बटलरनं एका चौकाराच्या मदतीने केल्या ५ धावा

15:20 (IST)29 Apr 2021
राजस्थानच्या संघात कोणताही बदल नाही

संजू सॅमसन (कर्णधार), जोस बटलर, यशस्वी जयस्वाल, डेविड मिलर, शिवम दुबे, राहुल तेवतिया, रियान पराग, ख्रिस मॉरिस, जयदेव उनाडकट, चेतन सकारिया, मुस्ताफिजुर रहमान

15:19 (IST)29 Apr 2021
मुंबईच्या इशान किशनला आराम

दिल्लीतील खेळपट्टीचा अंदाज घेत इशान किशनला आराम देण्यात आला आहे. त्याच्याऐवजी मुंबईच्या संघात अष्टपैलू नाथन नायलला संधी देण्यात आली आहे

15:11 (IST)29 Apr 2021
दोन्ही संघातील ११ खेळाडू

राजस्थान- संजू सॅमसन (कर्णधार), जोस बटलर, यशस्वी जयस्वाल, डेविड मिलर, शिवम दुबे, राहुल तेवतिया, रियान पराग, ख्रिस मॉरिस, जयदेव उनाडकट, चेतन सकारिया, मुस्ताफिजुर रहमान

मुंबई- रोहित शर्मा (कर्णधार), क्विटन डि कॉक, सूर्यकुमार यादव, किरॉन पोलार्ड, हार्दीक पंड्या, कृणाल पंड्या, नाथन कल्टर नायल, जयंत यादव, राहुल चाहर, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट

15:06 (IST)29 Apr 2021
रोहित शर्माकडून नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय

मुंबईनं राजस्थानला पहिल्यांदा फलंदाजीचं आव्हान दिलं आहे. राजस्थान मुंबईसमोर मोठं आव्हान ठेवण्यासाठी आक्रमकपणे उतरेल.