07 August 2020

News Flash

५४ व्या वर्षी माईक टायसन करणार पुनरागमन

२००५ साली खेळला होता अखेरचा सामना

बॉक्सिंग विश्वातले दिग्गज खेळाडू आणि माजी हेविवेट चँपिअन माईक टायसन वयाच्या ५४ व्या वर्षी बॉक्सिंग रिंगमध्ये पुनरागमन करणार आहेत. १२ सप्टेंबररोजी टायसन रॉय जोन्स ज्युनिअरसोबत एका प्रदर्शनीय सामन्यात खेळतील. २००५ साली टायसन यांनी केविन मॅकब्रिजसोबत अखेरचा सामना खेळला होता. यानंतर तब्बल १५ वर्ष ते बॉक्सिंग रिंगपासून दूर होते. या लढतीसाठी आपण उत्सुक असल्याचं टायसन यांनी म्हटलं आहे.

काही महिन्यांपूर्वी टायसन यांनी आपला वर्कआऊट करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर टाकला होता. त्यावेळीच टायसन पुन्हा रिंगमध्ये परतणार का अशी त्यांच्या चाहत्यांमध्ये चर्चा सुरु झाली होती. १९८६ साली वयाच्या २० व्या वर्षी टायसन यांनी हेविवेट चँपिअनशीप जिंकत ही स्पर्धा जिंकणारा सर्वात तरुण खेळाडू हा मान पटकावला होता. यानंतर बॉक्सिंग विश्वावर टायसन यांनी आपलं अधिराज्य निर्माण केलं. टायसन यांनी आपल्या कारकिर्दीत मिडलवेट, सुपर मिडलवेट आणि लाईट हेविवेट अशा तिन्ही पद्धतीत विजेतेपद मिळवलं आहे. २००३ साली टायसन पूर्णपणे हेविवेट प्रकारात खेळायला लागले. त्यामुळे आपल्या पुनरागमनाच्या सामन्यात टायसन कसा खेळ करतात याकडे त्यांच्या चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 24, 2020 10:47 am

Web Title: mike tyson 54 to make boxing comeback in september psd 91
Next Stories
1 लिजंड्स चषक बुद्धिबळ स्पर्धा : आनंदचा सलग दुसऱ्या सामन्यात पराभव
2 इतिहास घडवण्यासाठी वेस्ट इंडिज सज्ज
3 ‘बीसीसीआय’ आणि ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’वर अख्तरची टीका
Just Now!
X