भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २४ फेब्रुवारीपासून क्रिकेट मालिका सुरु होणार आहे. या मालिकेआधी प्रत्येक खेळाडू कसून सराव करताना दिसत आहे. मात्र मालिकेआधी भारताचे दोन महत्वाचे दोन खेळाडू नव्या लुकमध्ये दिसत आहेत. भारताचा सलामीवीर रोहित शर्मा आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी या दोघांचा मालिकेआधी आपला नवा लूक सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे.
२००७ च्या टी २० विश्वचषक स्पर्धेत चषक उंचावलेला लांब केसांचा धोनी साऱ्यांचा लक्षात आहे. तेव्हापासून धोनीच्या स्टाईलची आणि लूकची कायम चर्चा असते. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासूनच चाहत्यांना त्याच्या लांब केसाने भुरळ पाडली होती. त्यावर आता धोनीच्या या नव्या हेअर स्टाईल लूकची चर्चा होत आहे. त्याची हेअरस्टाइलिस्ट सपना मोटवानी हिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन हे फोटो शेअर केले आहेत.
धोनीवर ही हेअरस्टाईल शोभून दिसत आहे. तसेच ही नवीन हेअरस्टाईल चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे.
याशिवाय भारताचा स्फोटक फलंदाज मुंबईकर रोहित शर्मा यानेही या मालिकेआधी नवा लूक धारण केला आहे. या नव्या रुपात तो झकास दिसत असून या फोटोत तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळण्यासाठी चांगलाच उत्सुक असल्याचे दिसत आहे. न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या टी २० मालिकेत भारताला विजय मिळवून देणे रोहित शर्माला शक्य झाले नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत चांगली कामगिरी करण्यासाठी रोहित सज्ज आहे.
View this post on Instagram
Here’s to starting the day right
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडिया आधी २ टी २० सामन्यांची मालिका खेळणार आहे तर नंतर ५ सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे.