टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला कार आणि बाइकची आवड असल्याचे अनेकांना माहित आहे. धोनीकडे अनेक महागड्या बाइक आणि कार असल्याचे म्हटले जाते. तो बऱ्याच वेळा रांचीच्या रस्त्यांवर बाइक चालवताना देखील दिसतो. त्याच बरोबर धोनी त्याच्या सोशल मीडियावरसुद्धा बाइक आणि कार सोबतचे फोटो शेअर करत असतो. नुकताच धोनीची पत्नी साक्षीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर माहीच्या बाइक कलेक्शनचा फोटो शेअर केला.

साक्षीने धोनीचा हा फोटो शेअर करत ‘Even Bike have a View’ असे छान कॅप्शन दिले. खरतर धोनीच्या बाइकचा व्हिडीओ साक्षीच्या एका फॅन पेजने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. त्यानंतर तो व्हिडीओ पाहून काही वेळातच साक्षीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरदेखील धोनीच्या बाइकचा फोटो शेअर केला.

माहीचे हे बाइक कलेक्शन रिंग रोड फार्म हाऊस येथील आहे. या बाइक कलेक्शनमध्ये धोनीच्या बाइक दिसत आहेत. यामध्ये Kawasaki Ninja H2, Suzuki Hayabusa, norton vintage अशा अनेक महागड्या बाइकचा समावेश आहे. तसेच माही फेरारी, द जीएमसी सियरा अशा अनेक कारचा मालक आहे.