सलामीवीर शिखर धवन आणि कर्णधार रोहित शर्माने झळकावलेल्या शतकांच्या जोरावर भारताने आशिया चषकात पुन्हा एकदा पाकिस्तानवर मात केली आहे. दुबईच्या मैदानात Super 4 गटात खेळवण्यात आलेल्या सामन्यात भारताने पाकवर ९ गडी राखून मात करत अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चीत केलं आहे. पाकिस्तानने विजयासाठी दिलेलं २३८ धावांचं आव्हान भारताने रोहित-शिखरच्या भागीदारीच्या जोरावर सहज पूर्ण केलं. दोन्ही फलंदाजांनी सुरुवातीपासून सावध सुरुवात करत खेळपट्टीवर आपले पाय रोवले. यानंतर दोन्ही खेळाडूंनी पाकिस्तानी गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत रोहित-शिखरने धावा कुटल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या सामन्यात आणखी एक गोष्ट घडली. या सामन्यात भारताचा यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी याने माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड याचा विक्रम मोडला. धोनीने पाकिस्तानविरुद्ध खेळलेला सामना हा त्याचा ५०५वा आंतरराष्ट्रीय सामना ठरला. या बरोबरच धोनी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा दुसऱ्या क्रमांकाचा भारतीय खेळाडू ठरला. द्रविडने एकूण ५०४ सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. हा विक्रम मोडीत काढून धोनीने आपला ५०५वा सामना खेळला. या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा ६६४ सामने खेळून आवळा स्थानी आहे.

धोनीने खेळलेल्या ५०५ सामन्यांमध्ये ९० कसोटी, ३२२ एकदिवसीय आणि ९३ टी२० सामन्यांचा समावेश आहे. तसेच धोनीने या सामन्यांमध्ये एकूण १५ शतके आणि १०२ अर्धशतके झळकावली आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ms dhoni breaks rahul dravids record of most int matches
First published on: 24-09-2018 at 05:57 IST