भारतीय संघाने वर्षाची शेवट दमदार मालिका विजयाने केली. वेस्ट इंडिजविरूद्धच्या शेवटच्या निर्णायक एकदिवसीय सामन्यात भारताने पाहुण्या संघाला ४ गडी राखून धूळ चारली. या विजयासह भारताने २१ व्या शतकातील दुसऱ्या दशकाची (२०१०-२०१९) शेवटही गोड केला. गेल्या काही वर्षात भारतीय संघाची भरभराट झाली. २०११ च्या विश्वचषक विजयापासून ते २०१९ च्या शेवटच्या मालिका विजयापर्यंत टीम इंडियाने धडाकेबाज कामगिरी केली. त्या पार्श्वभूमीवर भारताचा दमदार खेळाडू रॉबिन उथप्पा याने त्याला वाटणारे दशकातील सर्वोत्तम ११ वन-डे खेळाडू निवडले आहेत.

Video : …अन् गोलंदाजानेच केला धोनी-स्टाईल रन-आऊट

११ खेळाडूंच्या या यादीत सर्वाधिक म्हणजेच ५ खेळाडू हे भारतीय आहेत. भारताच्या रोहित शर्मासोबत विराट कोहली, युवराज सिंग आणि जहीर खानचा त्याने संघात समावेश केला आहे. विशेष म्हणजे संघाच्या कर्णधारपदाची आणि यष्टीरक्षणाची धुरा त्याने धोनीकडे सोपवली आहे. या आधी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जाहीर केलेल्या दशकातील सर्वोत्तम वन-डे खेळाडूंच्या संघातही धोनीला संघाचा कर्णधार ठरवण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा उथप्पाच्या संघात धोनीवर नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या व्यतिरिक्त वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, इंग्लंड आणि श्रीलंकेच्या केवळ एका खेळाडूला संघात स्थान देण्यात आले आहे. जसप्रीत बुमराहला मात्र संघाबाहेरच ठेवण्यात आले आहे.

हार्दिक-नताशाच्या साखरपुड्यावर विराट म्हणतो…

दशकातील सर्वोत्तम ११ वन-डे खेळाडूंचा संघ –

१. रोहित शर्मा (भारत)
२. ख्रिस गेल (वेस्ट इंडिज)
३. विराट कोहली (भारत)
४. स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया)
५. एबी डी व्हिलिअर्स (दक्षिण आफ्रिका)
६. युवराज सिंग (भारत)
७. महेद्रसिंग धोनी (भारत)
८. बेन स्टोक्स (इंग्लंड)
९. डॅनिअल व्हेटोरी (न्यूझीलंड)
१०. जहीर खान (भारत)
११. लसिथ मलिंगा (श्रीलंका)